Sambhajinagar News : बसस्थानक, रेल्वेस्थानकावर पाण्यासाठी मोजावे लागतात पैसे

उन्हाच्या तीव्रतेबरोबर थंड पाण्याची मागणी वाढत असल्याने पाणी विक्रेते मनमानी पैसे वसूल करत आहेत.
Sambhajinagar News
Sambhajinagar News : बसस्थानक, रेल्वेस्थानकावर पाण्यासाठी मोजावे लागतात पैसेfile photo
Published on
Updated on

Sambhajinagar News: You have to pay for water at bus stops and railway stations

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मध्यवर्ती बसस्थानक, सिडको बसस्थानक तथा मुख्य रेल्वेस्थानकांसह मुकुंदवाडी रेल्वेस्थानकांवर प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने पाण्यासाठी पैसे मोजावे लागत आहेत. उन्हाच्या तीव्रतेबरोबर थंड पाण्याची मागणी वाढत असल्याने पाणी विक्रेते मनमानी पैसे वसूल करत आहेत. या विक्रेत्यांवर प्रशासनाचा कुठलाही धाक नसल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Sambhajinagar News
आव्हई येथे जलजीवन पाणीपुरवठा योजनेचा उडाला बोजवारा

मुख्य रेल्वेस्थानकांवर रेल्वे प्रशासनाच्या वतीने ५ रुपयांचे एक लिटर शुद्ध व थंड पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला होता. परंतु ही योजना काही दिवसांतच गुंडाळली गेल्याने प्रवाशांना पाण्यासाठी नाविलाजाने पाणी विक्रेत्यांकडून बाटलीबंद पाणी घ्यावे लागत आहे. हे विक्रेते कधी १५ तर कधी २० रुपये आकारणी करत आहेत.

तसेच अनेक विक्रेते कंपनीच्या नावाखाली तेथीलच पाणी भरून केवळ त्याला फ्रीजमध्ये ठेवून तेच थंड पाणी प्रवाशांच्या माथी मारून बक्कळ पैसा कमावत आहेत. प्रवाशांच्या या असुविधेबाबत रेल्वे प्रशासन काहीच पावले उचलत नसल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.

रेल्वेत नीर व बसमध्ये नाथजल विक्री करण्यास प्राधान्य द्यावे असे नियम असतानाही पाणी विक्रेते मात्र इतर कंपनींच्या बॉटल विक्री करण्यास प्राधान्य देत आहेत. त्यामुळे पाण्याच्या व्यवसायांतून होणारा नफा एसटी, रेल्वे प्रशासनाऐवजी इतर कंपन्यांनाच जास्त जात आहे.

Sambhajinagar News
Jalna illegal water connections : जालना-अंबड जलवाहिनीवरील सत्तर अनधिकृत कनेक्शन केले खंडित

पाण्याची व्यवस्था नाही

बसस्थानकातील प्रवाशांना स्वच्छ व थंडगार पिण्याचे पाणी मिळावे म्हणून इनरव्हिल कल्बच्या वतीने १ एप्रिल २०२३ रोजी अशी व्यवस्था करून दिली होती. यातून काही दिवस प्रवाशांना थंड पाणी मिळाले परंतु त्याची देखभाल योग्यरीतीने झाली नसल्याने ती योजनाही निष्क्रिय ठरली. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात प्रवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी पैसे मोजण्याची वेळ आली आहे. याच बरोबर सिडको बसस्थानक व मुकुंदवाडी रेल्वेस्थानकांवरही प्रवाशांसाठी पाण्याची व्यवस्था नसल्याने येथेही बाटलीबंद पाण्यानेच तहान भागवावी लागत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news