Fraud Case : म्हाडाचे घर मिळवून देण्याचे आमिष; समाजसेविकेला १.५ लाखाचा गंडा

नेते, म्हाडाच्या अधिकाऱ्यांशी ओळख असल्याची थाप; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
Financial fraud
Financial fraudpudhari photo
Published on
Updated on

Sambhajinagar News: Lured with the Promise of a MHADA Flat; Social Worker Swindled Out of ₹1.5 Lakhs

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा पुणे येथे एकल महिला कोट्यातून म्हाडाचे घर मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका समाजसेविकेची १ लाख ५३ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बुधवारी (दि.६) सिडको पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Financial fraud
लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

श्रीकृष्ण वसंतराव तौर ऊर्फ बाळराजे (रा. आरणगाव, ता. परांडा, धाराशिव) आणि त्याचा साला तेजस विकास गायकवाड (रा. पुणे) अशी फसवणूक करणाऱ्या दोघांची नावे आहेत. फिर्यादी सुवर्णा भगवानराव मोहिते (४२, रा. एन-११, मयूर नगर, हडको) यांच्या तक्रारीनुसार, त्या समाजसेविका असून, २०१३-१४ मधील एका आंदोलनादरम्यान त्यांची ओळख श्रीकृष्ण तौर ऊर्फ बाळराजे याच्याशी झाली होती.

त्यानंतर कधीच संपर्क न करणाऱ्या तौरने फेसबुकवरून सुवर्णा यांचा मोबाईल नंबर मिळवून २०२३ मध्ये संपर्क साधला. आपले राजकीय नेते आणि म्हाडातील अधिकाऱ्यांशी ओळख असल्याचे सांगून त्याने सुवर्णा यांना पुण्यात एकल महिला कोट्यातून म्हाडाचे घर मिळवून देण्याचे आश्वासन दिले व त्यांचा विश्वास संपादन केला.

घरासाठी आधार कार्ड व शाळेची टी.सी. अशी कागदपत्रे व्हॉट्सअॅपवर मागवून घेत तौर याने वेळोवेळी पैशांची मागणी केली. त्यानुसार सुवर्णा यांनी स्वतःच्या आणि त्यांचा भाऊ शिवराज मोहिते याच्या मोबाईलवरून श्रीकृष्ण तौर आणि त्याचा साला तेजस गायकवाड (रा. पुणे) यांच्या बँक खात्यावर फोन पे द्वारे ५ मार्च २०२४ ते १६ सप्टेंबर २०२४ या कालावधीत एकूण १ लाख ५३ हजार ६६८ रुपये पाठवले.

Financial fraud
Sambhajinagar Fraud Case : टीडब्ल्यूजे कंपनीने गुंतवणूकदारांना घातला तब्बल ४.३३ कोटींचा गंडा

म्हाडाच्या घरांच्या सोडतीत नावच नाही

कालांतराने म्हाडाच्या घरांची सोडत जाहीर झाली, मात्र त्या यादीत सुवर्णा मोहिते यांचे नाव आले नाही. याबाबत त्यांनी तौरला विचारणा केली व पैशांचा तगादा लावला असता, त्याने आज-उद्या करतो असे सांगून उडवाउडवीची उत्तरे देत टाळाटाळ केली. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर सुवर्णा यांनी सिडको ठाणे गाठून बुधवारी (दि.६) तक्रार दिली. याच पद्धतीने त्याने अनेक लोकांना गंडा घातला आहे. पुण्यातही त्याने अनेकांना चुना लावल्याचे मोहिते यांनी स्पष्ट केले. अधिक तपास पोलिस निरीक्षक अतुल येरमे यांनी केली असून, पुढील तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक संजय नरोडे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news