Sambhajinagar News : 'त्या' वारकऱ्यांच्या वारसांना १६ लाखांच्या नुकसान भरपाईचे न्यायालयाचे आदेश

आषाढी वारीच्या दिंडीत पायी चालत असताना एसटी बसच्या धडकेत मृत्यू झालेल्या निवृत्ती सांडू मोकासे यांच्या वारसांना १६ लाख ५ हजार २०० रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश मोटार अपघात न्यायाधिकरणाने दिले आहेत.
Sambhajinagar news
Sambhajinagar News : 'त्या' वारकऱ्यांच्या वारसांना १६ लाखांच्या नुकसान भरपाईचे न्यायालयाचे आदेशfile photo
Published on
Updated on

Sambhajinagar News: Court Orders Compensation of ₹16 Lakhs for the Heirs of 'Those' Warkaris

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : आषाढी वारीच्या दिंडीत पायी चालत असताना एसटी बसच्या धडकेत मृत्यू झालेल्या निवृत्ती सांडू मोकासे यांच्या वारसांना १६ लाख ५ हजार २०० रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश मोटार अपघात न्यायाधिकरणाने दिले आहेत. ही रक्कम सहा टक्के व्याजासह देण्याचे निर्देश महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला (एसटी) देण्यात आले आहेत. न्यायाधिकरणाचे सदस्य निखिल पी. मेहता यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.

Sambhajinagar news
Chhatrapati Sambhajinagar crime : बीड बायपासवर लुटारू तृतीयपंथीच्या टोळीकडूनच वकिलाची हत्या

निवृत्ती मोकासे हे आळंदीहून पंढरपूरकडे आषाढी वारीसाठी पायी दिंडीत सहभागी झाले होते. या दिंडीतील भाविकांना पाणी वाटपाचे सेवाकार्य ते करत होते. दरम्यान, पुणे-अहिल्यानगर मार्गावर पाण्याचा टँकर पंक्चर झाल्याने काही भाविक रस्त्याच्या कडेला थांबले होते. याच वेळी तिथे उभ्या असलेल्या मोकासे यांना एसटी महामंडळाच्या बसने (एमएच-१४ एलएक्स-६४३७) जोराची धडक दिली. या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या मोकासे यांचा उपचारापूर्वीच दुर्दैवी मृत्यू झाला.

या प्रकरणी एसटी चालक तुषार योगिराज बाविस्कर याच्याविरुद्ध शिक्रापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मोकासे हे कुटुंबातील एकमेव कमावते व्यक्ती असल्याने त्यांच्या पश्चात कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे मृताच्या पत्नी व मुलांनी अॅड. देविदास हराळ यांच्यामार्फत न्यायाधिकरणात नुकसान भरपाईचा दावा दाखल केला.

Sambhajinagar news
लोक आदर्श पतसंस्थेत 6 कोटींचा घोटाळा; अध्यक्ष पठाणसह 11 जणांवर गुन्हा दाखल

बस सुनावणीदरम्यान, चालकाच्या निष्काळजीपणामुळेच हा अपघात घडल्याचे अॅड. हराळ यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधिकरणाने वारसांना १६ लाख ५ हजार २०० रुपये नुकसान भरपाई मंजूर केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news