

Sambhajinagar Municipal Corporation Fails in Equitable Water Distribution
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत शहराच्या पाण्यासह विविध प्रश्नांवर नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला धारेवर धरले. पाणीपुरवठा, भूमिगत ड्रेनेज, बीओटी प्रकल्प, अनधिकृत होर्डिंग्स आणि छत्रपती संभाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यावरून उपस्थित केलेल्या प्रश्नांवर अधिकाऱ्यांना उत्तरही देता आले नाही. अखेर पाणीपुरवठ्यावर विशेष सभा घेण्यात येईल, असे महापौर समीर राजुरकर यांनी जाहीर केले.
महापालिका निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आल्याने त्यांनी शिवसेना शिंदे गटाशी युती करीत सत्ता स्थापन केली. भाजपचे महापौर म्हणून समीर राजुरकर, तर शिंदेसेनेचे उपमहापौर राजेंद्र जंजाळ हे विराजमान झाले. पदाधिकाऱ्यांच्या निवडीनंतर शुक्रवारी महापालिकेची पहिलीच नियमित सर्वसाधारण सभा झाली. यात विरोधकांनी सत्ताधारींसह प्रशासनाला विविध विषयांवरून घेरले.
पाणीपुरवठा कुठे चार दिवसांआड तर कुठे दहा दिवसांआड का, असे अफसर खान म्हणाले. त्यावर वंचितचे अमित भुईगळ यांनी समन्यायी पाणी वाटप व्हावे, नवीन पाणीप-रवठा योजनेत अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाची कामे झाली आहेत.
काही ठिकाणी अद्यापही जलवाहिनी टाकण्यात आलेली नाही. मुख्य कंत्राटदाराने नियुक्त केलेल्या उपकंत्रादारांनीच हा प्रकार केला आहे. त्यांच्या निकृष्ट कामाचे पुरावे आल्याकडे असून, त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली