नागरिकांना दर्जेदार सेवा द्या

मनपा आयुक्तांचे अधिकाऱ्यांना आदेश: सर्व विभागांचा सखोल आढावा
sambhajinagar news
नागरिकांना दर्जेदार सेवा द्याfile photo
Published on
Updated on

Sambhajinagar Municipal Commissioner's Directives to Officials: Comprehensive Review of All Departments

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील नागरिकांना दर्जेदार सेवा उपलब्ध करून द्याव्यात, असे आदेश महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त अमोल येडगे यांनी अधिकाऱ्यांना दिले. मनपा प्रशासनातील कामकाज अधिक पारदर्शक, गतिमान आणि परिणामकारक करण्याच्या उद्देशाने त्यांनी रविवारी (दि.५) विविध विभागांचा सविस्तर आढावा घेतला.

sambhajinagar news
मनपा आयुक्तांकडून शहरातील नाले सफाईचे आदेश

मनपा मुख्यालयात झालेल्या बैठकीत लेखा, नगररचना, आरोग्य, घनकचरा व्यवस्थापन, उद्यान, कर संकलन, मालमत्ता, प्रधानमंत्री आवास योजना तसेच अतिक्रमण विभागाच्या कामकाजाची त्यांनी तपशीलवार समीक्षा केली. यावेळी प्रलंबित फाईल्स तातडीने निकाली काढण्यासोबतच कामकाजातील विलंब टाळण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. सर्व विभागांनी ठरलेल्या कालमयदित काम पूर्ण करावे आणि नागरिकांना दर्जेदार सेवा उपलब्ध करून द्याव्यात, यावर त्यांनी विशेष भर दिला.

मनपा प्रशासनातील कामकाज अधिक पारदर्शक, गतिमान आणि परिणामकारक करण्याच्या उद्देशाने महापालिकेचे आयुक्त अमोल येडगे यांनी रविवारी विविध विभागांचा सविस्तर आढावा घेतला. कर वसुलीचा आढावा घेताना आगामी काळात वसुलीत लक्षणीय वाढ साध्य करण्यासाठी नियोजनबद्ध उपाययोजना राबविण्याचे निर्देश आयुक्त येडगे यांनी दिले.

sambhajinagar news
Amol Yedge : नागरिकांसह औद्योगिक विकासासाठी सुविधांवर भर देणार

तसेच तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) चा वापर करून वसुली प्रक्रिया अधिक सुलभ व जलद करण्यावर भर द्या, कमी कार्यक्षम कर्मचाऱ्यांचे मूल्यमापन करून आवश्यक सुधारणा करण्याचे निर्देश देण्यात आले. यावेळी नगररचना विभागाचा आढावा घेताना डी.पी. रस्ते, टीडीआर, पीपीपी प्रकल्प, वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उपाययोजना, पार्किंग व्यवस्थापन आणि पायाभूत सुविधा विकासावर विशेष लक्ष केंद्रित करण्याचे आदेश आयुक्त येडगे यांनी दिले. दिव्यांगांसाठी स्वतंत्र ग्रंथालय सुरू करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या.

महसूल वाढीवर भर द्या

महसूल वाढीसाठी विविध पर्यायांचा शोध घेण्याचे निर्देशही संबंधित विभागांना देण्यात आले. आरोग्य विभागाच्या कामकाजात बायोमेडिकल वेस्ट व्यवस्थापन, कुत्रा चावणे व रेबीज नियंत्रण, रुग्णवाहिका सेवा तसेच सार्वजनिक आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news