Bribery case: मक्रणपूर, रेल ग्रामपंचायत अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

मक्रणपूर व रेल ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी विजय जोंधळे यांना ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहात पकडले
Bribery case
Bribery casePudhari
Published on
Updated on

कन्नड : तालुक्यातील मक्रणपूर व रेल ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी विजय जोंधळे यांना ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहात पकडले. बुधवारी सायंकाळी सुमारे ४ वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, गावात करण्यात आलेल्या पेवर ब्लॉक कामाचे बिल काढून देण्यासाठी विजय जोंधळे यांनी संबंधितांकडे एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. मात्र, तडजोडीअंती ४० हजार रुपये देण्याचे ठरले. याबाबत संबंधितांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.

तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे लाचेची रक्कम स्वीकारताना विजय जोंधळे यांना पथकाने रंगेहात पकडले. या कारवाईमुळे ग्रामपंचायत प्रशासनात खळबळ उडाली असून तालुक्यात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक शांतीलाल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रविंद्र काळे, विलास चव्हाण, चांगदेव बागुल, रामेश्वर गोरे तसेच इतर कर्मचाऱ्यांच्या पथकाने केली. या प्रकरणी पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news