Sambhajinagar firing case : हनुमाननगर गोळीबार प्रकरण : शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्याला बेड्या

गुन्ह्यात सहभाग निष्पन्न; २७ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी
Sambhajinagar firing case
हनुमाननगर गोळीबार प्रकरण : शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्याला बेड्याpudhari photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : पुंडलिकनगर भागातील हनुमाननगर चौकात गंगवारमधून नुकत्याच झालेल्या गोळीबार प्रकरणात सहभाग आणि आरोपींना रसद पुरवणारा शिंदे सेनेचा पदाधिकारी राहुल साहेबराव चाबुकस्वार याला पोलिसांनी बेड्या राहुल चाबुकस्वार ठोकल्या आहेत.

गोळीबाराच्या आधी आणि नंतरही तो सातत्याने आरोपींच्या संपर्कात असल्याचे तपासात उघड झाले आहे. न्यायालयाने त्याला २७ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, मनपा निवडणुकीच्या तोंडावर चाबुकस्वारने भाजप सोडून शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला होता.

Sambhajinagar firing case
Chhatrapati Sambhajinagar Crime : भर चौकात गोळीबार अन् चाकू हल्ला; गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक संपला?

पोलिसांच्या माहितीनुसार, मिरवणुकीत फोटो झळकावल्याच्या कारणावरून कुख्यात गुंड पवन दिवेकर, त्याचा नातेवाईक कुणाल साळवे (रा. न्यायनगर) यांचा नीलेश ऊर्फ सूर्या रांजणे (रा. गारखेडा) याच्याशी टोकाचा वाद झाला होता. या वादाची ठिणगी उडून १६ एप्रिलला हनुमाननगर चौकात दोन्ही गटांत जोरदार राडा झाला.

अतिशय वर्दळीच्या भागात एकमेकांवर थेट गोळ्या झाडण्यात आल्या. या घटनेनंतर परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले. रांजणे गटातील नीलेश रांजणे, आदित्य दाभाडे, आकाश साळुंखे, अमोल साळुंखे, ओंकार गिरी व इतर दोघांवर, तर दिवेकर गटातील पवन दिवेकर, कुणाल साळवे, रोहन दिवेकर, सिद्धार्थ चाबूकस्वार आणि सतीश हिवराळे यांच्याविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले. त्याच रात्री पोलिसांनी दिवेकर आणि रांजणे गँगच्या सात जणांना उचलले. पहाटे चार वाजेच्या सुमारास पैठणगेट भागातून उपनिरीक्षक अर्जुन राऊत यांच्या पथकाने दिवेकरच्या मुसक्या आवळल्या होत्या. पाठलाग करताना उपनिरीक्षक राऊत जखमीही झाले होते.

दोन्ही गँगचे आठ जण अटकेत

पोलिसांनी गुंड पवन दिवेकर, कुणाल साळवे, महेश साळवे (रा. संसारनगर), रोहन दिवेकर (रा. मिल कॉर्नर), सतीश हिवराळे (रा. समतानगर), सिद्धार्थ चाबूकस्वार (रा. गारखेडा) आणि दुसऱ्या गटातील गटातील नीलेश रांजणे आणि आकाश साळुंखे (रा. हनुमाननगर) यांना अटक केलेली आहे.

Sambhajinagar firing case
Youth crime case | लहान वयात मुडदे पाडण्याची धाडस येते कुठून?

दुसऱ्या गटाला धमकावले

राहुल चाबुकस्वार याचा १४ एप्रिल रोजी झालेल्या वादात प्रत्यक्ष सहभाग होता. गोळीबाराची घटना घडण्यापूर्वी आणि त्यानंतरही राहुल संशयास्पदरीत्या आरोपींच्या सतत संपर्कात होता. तसेच त्याने दिवेकर गटाला आणि काही साक्षीदारांना धमकावल्याचे पोलिस तपासात समोर आले. पोलिसांनी तांत्रिक तपास करत सबळ पुरावे गोळा करून राहुलला अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास उपनिरीक्षक विनोद भालेराव करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news