Chhatrapati Sambhajinagar DCC Bank : जिल्हा बँक चेअरमन पदासाठी शिंदे सेनेमध्येच रस्सीखेच

भाजपानेही ७ संचालकाच्या बळावर थेट वरूनच फिल्डिंग लावल्याने जिल्हा बँकेचे राजकारण राज्यपातळीवरही गाजत असल्याचे चित्र
DCC Bank chairman race
जिल्हा बँक चेअरमन पदासाठी शिंदे सेनेमध्येच रस्सीखेचpudhari photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक नवीन संचालक मंडळाच्या निवडीनंतर आता सर्वांचेच लक्ष चेअरमन पदाच्या खुर्चीकडे लागले आहे. सर्वाधिक ९ संचालक निवडून आल्याने प्रथम दावेदार असलेल्या शिवसेना शिंदे गटातच या पदासाठी अंतर्गत रस्सीखेच सुरू आहे. तर दुसरीकडे भाजपानेही ७संचालकाच्या बळावर थेट वरूनच फिल्डिंग लावल्याने जिल्हा बँकेचे राजकारण राज्यपातळीवरही गाजत असल्याचे चित्र आहे.

जिल्हा बँकेचे २० संचालक पदासाठीची निवडणुक प्रक्रिया नुकतीच पार पडली. ५ जुलै रोजी याचे निकालही जाहीर करण्यात आले. यात २० पैकी सर्वाधिक १९ उमेदवार हे महायुतीच्या पॅनलकडून निवडून आले, तर विरोधी मविआच्या पॅनलचे एकमेव खा. कल्याण काळे विजयश्री खेचून आणण्यात यशस्वी ठरले. महायुतीच्या पॅनलमधील १९ पैकी सर्वाधिक ९ संचालक हे शिंदे गटाचे निवडून आले आहेत, तर दुसरीकडे बँकेच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपाचे सहा संचालक निवडून आले आहेत.

DCC Bank chairman race
District Bank Elections : जिल्हा बँकेवर महायुतीच्या शेतकरी विकास पॅनलचे वर्चस्व

राष्ट्रवादी काँग्रेसचेही २ संचालक निवडून आले आहेत. महायुती म्हणून छप्परफाड बहुमत मिळाले आहे. मात्र चेअरमन आपलाच व्हावा, या महत्त्वाकांक्षेतून दोन्ही पक्ष पहिल्या दिवसापासूनच फिल्डिंग लावत आहेत. त्यातच या निवडणुकीत मोठा भाऊ ठरलेल्या शिंदे सेनेकडूनही खासदार संदीपान भुमरे यांचे पुत्र पैठणचे आ. विलास भुमरे आणि आ. अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार यांना संधी मिळावी, अशी इच्छा त्यांच्या तालुक्यातील कार्यकर्त्यांची आहे. तर बँकेच्या अध्यक्षपदाचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, असे बँकेचे नूतन संचालक तथा राज्याचे मंत्री अतुल सावे यांनी आधीच स्पष्ट केलेले आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावर कोण विराजमान होणार हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

चेअरमन पदासाठी लवकरच निवडणूक जिल्हा बँकेच्या नवीन संचालक मंडळाच्या निवडीनंतर १५ दिवसांत चेअरमन पदाची निवडणूक झाली पाहिजे. त्यानुसार नोटीफिकेशन काढण्यात आले आहे. उद्या बँकेच्या संचालक मंडळासोबत बैठक होईल. या बैठकीत चेअरमन पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरविण्यात येईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी समृत जाधव यांनी दिली.

तीन संचालकांना डिमांड

महायुतीच्या पॅनलकडून १९ संचालक निवडून आले आहेत. यात शिंदेसेनेचे ९, भाजपाचे ६, राष्ट्रवादीचे २ आणि ठाकरे सेनेचे आ. अंबादास दानवे हेही महायुतीच्या पॅनलकडून संचालक झाले आहेत. अपक्ष अनिल बोरसे यांनी महायुतीला पाठिंबा दिला आहे. तर विरोधी पॅनलकडून काँग्रेसचे खा. कल्याण काळे आहेत. शिंदेगट आणि भाजपामध्ये अध्यक्षपदासाठी स्पर्धा लागल्याने या तिन्ही संचालकांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

DCC Bank chairman race
Chhatrapati Sambhajinagar District Bank election: जिल्हा बँकेवर महायुतीचे वर्चस्व; 20 पैकी 19 जागावर उमेदवारांचा विजय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news