Sambhajinagar Drought : दोन लाख ९६ हजार विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफीचा लाभ

विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालातील दुष्काळग्रस्त विद्यार्थी शासनाने जाहीर केलेल्या योजनेपासून एकही विद्यार्थी वंचित राहू नये यासाठी विद्यापीठ प्रशासनाने प्र कुलगुरू डॉ. प्रवीण वक्ते यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स स्थापन केला होता.
Sambhajinagar Drought
Sambhajinagar Drought : दोन लाख ९६ हजार विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफीचा लाभfile photo
Published on: 
Updated on: 

Sambhajinagar 296,000 students benefit from examination fee waivers

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदवी व पद्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी बसलेल्या २ लाख ९६ हजार ११४ विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफीचा लाभ मिळाला आहे. तर शुल्क भरलेल्या ५१ महाविद्यालयातील २५ हजार ७४ विद्यार्थ्यांचे शुल्क दिवाळी सुट्टीत परत करण्यात आले. अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. बी. एन. डोळे यांनी दिली.

Sambhajinagar Drought
Loan waiver : कर्जमाफी रखडली, बँकांकडून वसुलीचा तगादा

विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालातील दुष्काळग्रस्त विद्यार्थी शासनाने जाहीर केलेल्या योजनेपासून एकही विद्यार्थी वंचित राहू नये यासाठी विद्यापीठ प्रशासनाने प्र कुलगुरू डॉ. प्रवीण वक्ते यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स स्थापन केला होता. दिवाळीपूर्वी व दिवाळीनंतर अशा दोन टप्प्यांत या परीक्षा घेण्यात येत आहेत. पदवी परीक्षांचे २७ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर पेपर होणार आहेत. तर सर्व व्यावसायिक व पदव्युत्तर अभ्यासक्रमाची परीक्षा २१ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत.

दिवाळी सुटीच्या काळात ६ व ७ नोव्हेंबर या दोन दिवशी परीक्षा विभागातील समन्व्य विभाग सुरू ठेवण्यात आला. ५१ महाविद्यालयातील २५ हजार ७४ विद्यार्थ्यांनी १ कोटी ८८ लाख ३३ हजार ७६१ रुपये एवढे परीक्षा शुल्क जमा केले होते.

Sambhajinagar Drought
Fire incidents : फटाक्यांच्या ठिणग्यांनी ३० ठिकाणी आग

यातील ३४ महाविद्यालयांनी १ कोटी ३६ लाख ४४ हजार ७५६ रुपयांचे धनादेश परत नेले आहेत. संबंधित महाविद्यालयांनी या विद्यार्थ्यांना तत्काळ शुल्क परत करावेत, असे डॉ डोळे यांनी कळविले आहे. परीक्षा विभागातील समन्वयक विभागाचे उपकुलसचिव डॉ. विष्णु क-हाळे, राजेंद्र गांगुर्डे, महेंद्र पैठणे, हरिदास खुडे आदी कर्मचारी यासाठी प्रयत्नशील आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.