Sant Eknath Sugar Factory Case | संत एकनाथ साखर कारखाना प्रकरण: सचिन घायाळ यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

कामगारांचे पीएफ, वेतन तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे देयके न दिल्याचाही आरोप
Sant Eknath Sugar Factory Case
Sant Eknath Sugar Factory CasePudhari
Published on
Updated on

Sant Eknath Sugar Factory Case

पैठण : पैठण तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मालकीच्या संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याशी संबंधित कथित कर्ज घोटाळा प्रकरणात कारखाना करार पद्धतीने चालविणारे सचिन घायाळ यांना मोठा धक्का बसला आहे. छत्रपती संभाजीनगर येथील उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने शुक्रवारी (दि. ८) त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.

संत एकनाथ सहकारी साखर कारखाना गेल्या काही वर्षांपासून ‘सचिन घायाळ प्रायव्हेट शुगर लिमिटेड’ या कंपनीकडे करार तत्वावर चालविण्यास देण्यात आला होता. मात्र, करारातील अटींचे उल्लंघन करत कारखान्याची मालमत्ता बुलढाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीकडे गहाण ठेवून सुमारे ३० कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याचा आरोप आहे. यापैकी १६ कोटी ६२ लाख रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराचा ठपका सचिन घायाळ यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

Sant Eknath Sugar Factory Case
Sambhaji Nagar BJP | ZP निवडणुकीसाठी महायुतीची घोषणा : संभाजीनगरात भाजप कार्यकर्त्यांचा राडा

तसेच, कारखाना चालविताना कामगारांचे पीएफ, वेतन तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे देयके न दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मधुकर मोरे तपास करत आहेत.

दरम्यान, सचिन घायाळ यांनी यापूर्वी १ एप्रिल २०२६ रोजी पैठण जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. तो अर्ज न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेत पुन्हा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला.

Sant Eknath Sugar Factory Case
Chhatrapati Sambhaji Nagar Crime| गल्लेबोरगावात १३ जुगारी ताब्यात, ११ दुचाकींसह ७० हजारांची रोकड जप्त

उच्च न्यायालयात शासनाच्या वतीने अॅड. अमरजीतसिंह गिरासे यांनी बाजू मांडली, तर तक्रारदार दीपक मोरे यांच्या वतीने अॅड. डी. आर. काळे आणि अॅड. डी. एस. दसपुते यांनी जामीन अर्जाला विरोध केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सचिन घायाळ यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news