

नांदेड : शहरातील मिलिंदनगर परिसरात २७ नोव्हेंबर रोजी घडलेल्या तरुणाच्या हत्येप्रकरणी दोन कर्मचाऱ्यांविरुद्ध चौकशीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या दोन कर्मचाऱ्यांनीच मुख्य आरोर्पीना अवघ्या काही तासात अटक करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
२७ नोव्हेंबर रोजी मिलिंदनगर येथे सक्षम ताटे या तरुणाची प्रेम प्रकरणातून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. हत्येनंतर सर्व आरोपी पसार झाले होते; पण पोलिस अधीक्षक अविनाशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक प्रशांत शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आरोपींना तत्काळ अटक करण्यात यश मिळवले होते. १ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्यानंतर त्यांना आता पुन्हा वाढीव पोलिस कोठडी मिळाली आहे.
या प्रकरणात मुंबईचे विधिज्ञ डॉ. गुणरत्न सदावर्ते यांनी धीरज कोकुलवार व लक्ष्मण दासरवाड या दोन कर्मचाऱ्यांविरुद्ध तक्रार नोंदवली होती. या दोघांच्या अप्रत्यक्ष सांगण्यावरून हे हत्याकांड झाल्याचा आरोप सदावर्ते यांनी केल होता. या संदर्भात त्यांनी पोलिस महानिरीक्षक शहाजी उमाप यांची भेट घेऊन रीतसर तक्रान नोंदवली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षकांनी या प्रकरणाची चौकशी आत अतिरिक्त पोलिस अधीक्षक सूरज गुरव यांच्याकडे सोपवली आहे. विशेष म्हणजे दासरवाडक कोकुलवार या दोघांनी हत्याकांडानंतर मुख्य आर- ोपींचा काही वेळातच शोध घेऊन त्यांच्या मुसक्य आवळल्या होत्या. न्यायाधीशांपुढे जवाब नोंदवतांना संबंधित तरुणीने या दोघांच्या बाबतीत कोणतीही तक्रार केली नव्हती.