

छत्रपती संभाजीनगर : Saint Nipat Niranjan Baba | 'छावा' चित्रपटातून कूरकर्मा औरंगजेबाने छत्रपती संभाजीराजे यांच्यावर केलेले अत्याचार दाखविल्यानंतर मन संतापाने भरून येते. तरीही याच औरंगजेबाचे गर्वहरण आणि त्याला खडे बोल छत्रपती संभाजीनगर येथील सुफी संत निपट निरंजन यांनी सुनावले होते, असा इतिहास आहे. शहरातील पहाडसिंगपुरा भागात असलेले निपट निरंजन महाराजांचे मंदिर हे महाराजांच्या कर्तृत्वाची साक्ष देते.
१६२३ ते १७३८ हा निपट निरंजन महाराजांचा काळ. नाथ संप्रदायाशी संबंधित असलेल्या निपट निरंजन महाराजांची कीर्ती औरंगजेबापर्यंत पोहचली होती. त्यामुळे तो शहरात मुक्कामासाठी असताना लवाजाम्यासह भेटण्यासाठी आला. त्यावेळी महाराजांच्या अंगात ताप होता आणि घोंगडी अंगावर पांघरून ते एका भिंतीवर बसले होते. औरंगजेब हा आपल्याला भेटण्यासाठी येत नसून वश करून मराठ्यांची पाळेमुळे खणावयाची आहेत हे महाराजांनी ओळखले. त्यामुळे त्याला नामोहरम करण्यासाठी आपल्या अध्यात्मिक शक्तीचा प्रभाव त्यांनी दाखविला. अंगात ताप असला तरी घोंगडी बाजुला काढली. तेव्हा ताप घोंगडीत शिरला आणि घोंगडी थरथर कापू लागली.
औरंगजेब मंदिराजवळ येताच महाराजांनी संत ज्ञानेश्वराप्रमाणे भिंतीला चालण्याची आज्ञा दिली व ते औरंगजेबाला सामोरे गेले. औरंगजेब हा हत्तीच्या अंबरीत बसला होता. महाराजांनी भिंत वर उचलल्यामुळे औरंगजेबापेक्षा त्यांची उंची जास्त झाली. हे काहीतरी अजब रसायन आहे असे औरंगजेबाच्या लक्षात आले. त्याने महाराजांना दिल्ली येथे घेऊन जाण्यासाठी आलो आहे असे सांगितले. परंतु औरंगजेबाचे जुलमी अत्याचार त्याँना माहिती असल्याने त्यांनी नकार दिला.
यावेळी दोघांमध्ये झालेल्या संवादाच्या ११४ ओव्या उपलाब्ध असून ' निरंजन बानी' या पुस्तकात त्याचा उल्लेख आहे. त्यातील काही ओव्या अशा
दावा बादशहा का करते, और दुवा मांगते है तो फकीर से
कहे निपट ये दिल्ली का दरबार नही फकिरी दरबार है
चारो दिशा बाहर मार- काट किया कत्ले आम
और फकीर की दुवा मांगने आया है ?
का करते, दुवा माँगते? हम तो फव
कहे निपट ये देल्ही का दरबार नहीं, फकीरी दरब
चारो दिशा बाहर मार-काट किया कत्ले आम एक बहादुर की शीश कटवाई है...
गुरु गोविन्द सिंह के बेटे को नाहक दिवार में चिनब और फकीर की दुवा माँगने आया है ?....
औरंगजेब निपट निरंजनच्या सहवासात आठ दिवस राहिला. या वेळी त्याने बोरे खाण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा ती कोनाड्यात असल्याचे महाराज म्हणाले. त्याचे वर्णन संतकवी महिपतीनी आपल्या भक्तलीलामृत मध्ये केले आहे.
मशिदीत मध्य कोनाड्यात गेले जावोनि बैसले तयावेळी
पाशह कुराण पढावया आला | अकस्मात याला पाहता हे |
विचारात नाम निपट सांगती | बोलाविले प्रीती म्हणुनी आलो |
पाशहाने तेंव्हा केला चमत्कार | सांडोनि कलेवर मक्के गेला |
तेथे सिद्ध सात होते त्या | नमन बद्री वृक्ष जाण होता तेथे |
निपट हि गेले त्या वृक्षीं देखील | बोरे खाती वाहिले आनंदात |
पाशह प्रसाद मागातचि | म्हणत देऊ मशिदी चाल आता |
गेला शरीरात पाहे कोनाड्यात | बैसोनि हे बोरे खात तेथे |
बोराचा प्रसाद देता लोटांगण | घालोनिया म्हणे ईश्वर हा |
महाराज बधत नसल्यामुळे औरंगजेब माघारी निघाला. औरंगजेबाच्या बोराच्या इच्छेमुळे मंदिर परिसरात बोरांची भरपूर झाडे होती. मार्गशीर्ष वद्य एकादशीला यात्रा भरते. बोरे, पेरु, रेवड्यांचा प्रसाद देण्याची प्रथा आहे. याशिवाय कुस्त्यांची दंगल संयोजक आयोजित करतात. बीबी का मकब-यापासून काही मिनिटांच्या अंतरावर निपट निरंजन महाराजांचे समाधी मंदिर आहे. प्रो. भालचंद्रराव तेलंग आणि प्रा, राजमल बोरा यांनी निपट निरंजन यांच्या कवनाचे संकलन केले आहे.
पहाडसिंगपुऱ्यात राहणाऱ्या निपट बाबांची महती औरंगजेबाच्या कानावर गेली. स्वतःही "जिंदा पीर' अशी ख्याती असलेल्या बादशहानं या साधूची परीक्षा घ्यायचं ठरवलं. याची एक दंतकथा इथं प्रचलित आहे. बादशहानं वजीराला नजराणा देऊन पाठवलं. पण खोडसाळपणे तबकात रुमालाखाली मांसाचा तुकडा ठेवलेला होता. हे जाणलेल्या महाराजांनी रुमाल हटवायला सांगितलं, तर त्यात गुलाबाची फुलं निघाली. निपट बाबांनी नजराण्याचा जवाब म्हणून एक कवन लिहून धाडलं.
खोजा नहीं आपा तूने, भेजा तैने ऐसा तोहफा,
क्या अजाब क्या सवाब, पीता जो शराब है।।
आपको जो सोक्त करे, गैर को लज्जत भरे,
जिन्दगी शबाब में, मजा ले कबाब है।।
साकीए को सर मिले, बहरे बहदत हो ले,
दीन दुनिया से मिले, फूल ये गुलाब है।।
कै "निपट निरंजन', सुनो आलमगीर,
होश औ हवाश तबा, तोहफे का जवाब है।।