Saibaba Mahila Patsanstha Scam
ठेवीदारांनी वैजापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. (Pudhari Photo)

Chhatrapati Sambhajinagar News | साईबाबा महिला पतसंस्थेच्या सर्व शाखा बंद; चेअरमन, संचालक गायब, कोट्यवधी अडकल्याने ठेवीदारांमध्ये खळबळ

Saibaba Mahila Patsanstha Scam | ठेवीदारांची वैजापूर पोलीस ठाण्यात धाव, संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी
Published on
नितीन थोरात

Saibaba Mahila Patsanstha Scam Chhatrapati Sambhajinagar Finance Fraud

वैजापूर : जास्त व्याज देण्याचे आमिष दाखवून यापूर्वी जिल्ह्यात चार ते पाच पतसंस्थांनी ठेवीदारांची फसवणूक केली होती. आता साईबाबा महिला नागरी सहकारी पतसंस्थेची वैजापूर शाखेत कोटयवधींची आर्थिक गुंतवणूक करणाऱ्या शेकडो ग्राहकांची फसवणूक झाली आहे. संस्थेचे चेअरमन व संचालक मंडळ आर्थिक घोटाळा करुन गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

फसवणूक झालेल्या शेकडो ग्राहकांनी आमदार रमेश बोरनारे यांच्या नेतृत्वाखालील सोमवारी (दि.१९) वैजापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन संबंधितांवर गुन्हे दाखल करुन त्यांच्याकडून आर्थिक रक्कम वसूल करण्याची मागणी केली. दरम्यान या प्रकरणात आर्थिक फसवणूक झालेल्या ग्राहकांची एकूण किती कोटींची फसवणूक झाली यासाठी पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे यांनी महिती संकलित करण्यास सुरुवात केली आहे.

Saibaba Mahila Patsanstha Scam
Robbery | छत्रपती संभाजीनगर हादरलं! उद्योजकाच्या घरावर कोट्यवधींचा दरोडा; ८ किलो सोनं, ४० किलो चांदी लंपास

छत्रपती संभाजीनगर येथे समर्थनगर परिसरातील साईबाबा महिला नागरी सहकारी पतसंस्थेची वैजापूर शहरात म्हसोबा चौक परिसरातील शाखेतील आर्थिक व्यवहार बंद करण्यात आला. आठवडाभराचा कालावधी संपल्यानंतर पतसंस्था कामकाज बंद असल्याचे लक्षात आल्यानंतर ग्राहकांनी बँकेचे चेअरमन व संचालकांशी संपर्क साधला. मात्र, प्रतिसाद मिळत नसल्याने हादरलेल्या शेकडो ग्राहकांना आमदार रमेश बोरनारे यांची भेट घेऊन त्यांना आर्थिक फसवणूक झाल्याचे सांगितले.

सर्व ग्राहकांना सोबत घेऊन आ. बोरनारे यांनी ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या साईबाबा महिला नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमनसह संचालक मंडळाचा पोलीसानी शोध घेऊन ठेवीदारांची फसवणूक करणाऱ्या त्या त्या रक्कमेतून कुठे मालमत्ता खरेदी केली ती जप्त करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या.

Saibaba Mahila Patsanstha Scam
छत्रपती संभाजीनगर : महिला तलाठी लाचलुचपतच्या जाळ्यात

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news