वैजापुरात पेट्रोल टंचाईची अफवा

सकाळपासूनच वाहनांच्या रांगा, पुरेसा साठा उपलब्ध होणार
Vaijapur Petrol Shortage Rumors
वैजापुरात पेट्रोल टंचाईची अफवाfile photo
Published on
Updated on

Rumors of Petrol Shortage in Vaijapur

वैजापूर, पुढारी वृत्तसेवा शहरातील पेट्रोल पंपावर बुधवारी (दि. २५) सकाळपासूनच पेट्रोल भरून घेण्यासाठी वाहनधारकांनी रांगा लावल्याचे चित्र बघायला मिळाले.

Vaijapur Petrol Shortage Rumors
Beed News : बीड जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलचा राखीव साठा ठेवण्याचे आदेश

शिर्डी, श्रीरामपूर येथे पेट्रोल संपल्याने वैजापूर येथेही पेट्रोल मिळणार नाही अशी अफवा पसरल्याने मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पेट्रोलची खरेदी झाली व त्यानंतर टप्प्याटप्प्याने शहरातील पेट्रोल पंपावरील साठा संपत आला. परिणामी बुधवारपासून तर पंपावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

गरज नसतांना ग्राहकांनी उगीचच मोठ्या प्रमाणावर पेट्रोल खरेदी करू नये, पेट्रोलचा साठा उपलब्ध आहे असे आवाहन पेट्रोल पंप चालकांनी केले आहे. वैजापूर शहरात हिंदुस्थान पेट्रोलियम, इंडियन ऑइल (आयओसी) व भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) या कंपन्यांचे प्रत्येकी दोन तसेच नायरा व रिलायन्सचा प्रत्येकी एक असे सात पेट्रोल पंप आहेत. या सर्व पंपावर मुबलक प्रमाणावर पेट्रोल साठा होता.

Vaijapur Petrol Shortage Rumors
Iran Israel Conflict Petrol Crisis: इराण-इस्रायल संघर्ष; अफवांचा बाजार गरम, परभणीत इंधनासाठी झुंबड

मात्र, खरेदी वाढल्यामुळे यातील काही पंपावरील साठा संपला. त्यामुळे वाहन धारकांनी आपला मोर्चा दुसऱ्या पंपावर वळवत खरेदी केली. त्यामुळे क्रमांक्रमाने पंपावरील पेट्रोल संपले. त्यातच अफवेची भर पडल्याने वाहनांची पेट्रोल पंपावर एकच गर्दी झाली. तथापि पुढील काही दिवसातच पेट्रोलचा स्टॉक आल्यानंतर पुरवठा सुरळीत होईल अशी अपेक्षा आहे.

अचानक पेट्रोल संपल्याची अफवा झाल्याने तसेच शेजारच्या शिर्डी, श्रीरामपूर येथे पेट्रोल शिल्लक न राहिल्याने वाहचालकांनी पेट्रोल पंपावर गर्दी केली. त्यामुळे काही पेट्रोल पंपावरील साठा संपला होता. मात्र, काही दिवसांतच पेट्रोल स्टॉक उपलब्ध झाल्यानंतर परिस्थिती सुधारेल.
- अनंत बोडखे, अध्यक्ष, पेट्रोल, डिझेल संघटना वैजापूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news