Bribe Case : लायसन्स नूतनीकरणासाठी लाच घेताना आरटीओ एजंट जाळ्यात

करोडी आरटीओ कार्यालयाबाहेर कारवाई; गुन्हा दाखल
Bribe Case
Bribe Case : लायसन्स नूतनीकरणासाठी लाच घेताना आरटीओ एजंट जाळ्यातFile Photo
Published on
Updated on

RTO Agent Caught Red-Handed While Accepting Bribe for License Renewal

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : ड्रायव्हिंग टेस्ट पास करून देण्यासह विविध वाहनांच्या ड्रायव्हिंग लायसन्सचे नूतनीकरण करून देण्यासाठी साडेसहा हजार रुपयांची लाच घेणाऱ्या एका आरटीओ एजंटला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले.

Bribe Case
Parbhani News : मिनी मंत्रालयासाठी सरासरी ७१ टक्के मतदान

ही कारवाई बुधवारी (दि.२०) करोडी येथील आरटीओ कार्यालयाच्या मैदानात करण्यात आली. संजय सुरेश कामिल (५८, रा. गोलवाडी) असे या आरोपी एजंटचे नाव असून, याप्रकरणी दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्रीउशिरापर्यंत सुरू होती.

तक्रारदाराला त्यांची दुचाकी, श्री-व्हीलर, फोर-व्हीलर आणि ट्रान्सपोर्ट (हेवी) वाहनाचे ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरण करायचे होते. तसेच या प्रक्रियेतील ड्रायव्हिंग टेस्टही पास करून हवी होती. या सर्व कामांसाठी आरटीओ कार्यालयात वावरणाऱ्या संजय कामिल या एजंटने तक्रारदाराकडे थेट १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. मात्र तडजोडीअंती ६ हजार ५०० रुपये देण्याचे ठरले होते. तक्रारद ाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी तात्काळ एसीबीकडे तक्रार नोंदवली.

Bribe Case
Chhatrapati Sambhaji Nagar Crime| गल्लेबोरगावात १३ जुगारी ताब्यात, ११ दुचाकींसह ७० हजारांची रोकड जप्त

ही कारवाई एसीबीच्या पोलिस अधीक्षक माधुरी कांगणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शांतीलाल चव्हाण, चैनसिंग घुसिंगे, रवींद्र काळे आणि विलास चव्हाण यांच्या पथकाने केली. या प्रकरणात आरटीओ कार्यालयातील आणखी कोणाचे लागेबांधे आहेत का, याचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे.

डोक्यावरील टोपी काढताच खेळ खल्लास

लाचेची रक्कम स्वीकारण्यासाठी एजंटने तक्रारदाराला करोडी आरटीओ कार्यालयाबाहेरील मैदानात बोलावले होते. एसीबीच्या पथकाने तिथे आधीच सापळा रचला होता. लाच स्वीकारताना पैसे हातात दिल्यावर डोक्यावरील टोपी काढणे असा सांकेतिक इशारा तक्रारदार आणि एसीबी अधिकाऱ्यांमध्ये ठरला होता. तक्रारदाराने साडेसहा हजार रुपये एजंटच्या हातात दिले आणि डोक्यावरील टोपी काढली. हा इशारा मिळताच एसीबीच्या पथकाने एजंट संजय कामिल याला रंगेहाथ पकडले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news