Maratha Reservation : मराठवाड्यात अनेक ठिकाणी रास्ता रोको

जरांगे यांच्या समर्थनार्थ आंदोलन, प्रमुख मार्गावर वाहनांच्या रांगा, झाडाच्या फांद्या टाकून, टायर जाळून निषेध
Maratha Reservation
Maratha Reservation : मराठवाड्यात अनेक ठिकाणी रास्ता रोकोfile photo
Published on
Updated on

Roadblocks at many places in Marathwada

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ मराठवाड्यात बुधवारी (दि.२) काही ठिकाणी रास्ता रोको आंदोलन झाले. संभाजीनगर, बीड, जालना, परभणीत आंदोलने झाली असून, गुरुवारी आंदोलनाची तीव्रता वाढण्याची चिन्हे आहेत. अंतरवाली सराटीजवळील धुळे - सोलापूर मार्गावर सकाळी रास्ता रोको झाल्याने दीड तास दोन्ही बाजूने वाहतूक ठप्प झाली होती.

दरम्यान, गुरुवारी जालना, - बीड, लातूर जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. नजरांगे यांच्या उपोषणावर तोडगा निघत नसल्यामुळे न त्यांच्या प्रकृतीवर परिणाम होत आहे. रात्री जालन्याच्या जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांनी 5 सरकारचा मसुदा सादर करून त्यांच्याशी चर्चा न करण्याचा प्रयत्न केला. परंतु जरांगे यांनी त्यास प्रतिसाद दिला नाही. दुसरीकडे विखे, उदय सामंत या मंत्र्यांनी पत्रपरिषदेत सरकारची भूमिका मांडली आहे. न जरांगे यांचे उपोषण पाचव्या दिवशीही सुरूच 1 राहिल्याने समर्थक हवालदिल झाले आहेत.

वडीगोद्रीत कार्यकर्ते आक्रमक

धुळे - सोलापूर महामार्गावर वडीगोद्री फाट्याजवळ रस्त्यावरच ठिय्या मारीत आंदोलकांनी जेवणाची पंगत मांडली. पोलिसांनी आंदोलकांना रस्ता मोकळा करण्याची विनंती करूनही आंदोलन चालूच होते. अखेरीस अंतरवाली सराटीच सरपंच पांडुरंग तारख यांनी आंदोलकांची समजूत काढल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

भोकरदन तालुक्यातील केदारखेडा येथे मंगळवारी रात्री रस्त्यावर टायर जाळून निषेध करत जरांगे यांना पाठिंबा दर्शविला. महाकाळा येथे मराठा समाजबांधवांनी रस्ता रोको आंदोलन केले. परतूर तालुक्यातील नांगरतास धरणात काही मराठा समाजबांधवांनी जलसमाधी आंदोलन सुरू केले आहे. पैठणमध्ये निषेध जरांगे यांच्या पाठिंब्यासाठी पैठण येथे झालेल्या आंदोलनामुळे छत्रपती संभाजीनगर, पाचोड, शेवगाव मार्गावरील वाहतूक विस्वळीत झाली. निवेदन घेण्यासाठी पैठण तहसीलदार न आल्याने यावेळी त्यांचा निषेध करण्यात आला.

बीड - परळी मार्ग ठप्प

बीड-परळी महामार्गावरील जरूड फाट्याजवळ नाळवंडी परिरातील समाजबांधवांनी रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे हा मार्ग तासभर ठप्प होता. दुचाकी, चारचाकी वाहनाच्या रस्त्यावर रांगा लागल्या होत्या. तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी आंदोलन स्थळी धाव घेत आंदोलकांशी संवाद साधला. तहसीलदारांनी निवेदन स्वीकारल्यानंतर आंदोलन थांबले. मंगळवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास पाडळशिंगी टोलनाक्यानजीक काही आंदोलक एकत्र आले होते, त्यांनी रस्त्यावर टायर पेटवून रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केल्याने आंदोलक तेथून निघून गेले. गुरुवारी (दि.3) बीड जिल्हा बंदची हाक देणाऱ्या पोस्ट सोशल मीडियातून देण्यात आली आहे.

मानवतला रस्त्यावर फांद्या टाकल्या

मानवत तालुक्यातील शहरातील महाराणा प्रताप चौकात साडेतीन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आला. आंदोलकांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वर टायर जाळून व रस्त्यावर झाडे टाकल्याने वाहतूक ठप्प झाली होती. रास्ता रोकोची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आंदोलकाशी चर्चा केली. यावेळी तहसील प्रशासनाच्या वतीने निवेदन स्वीकारण्यात आले.

कार्यकर्ता जलकुंभावर

जरांगे यांच्या जीवाला काही झाले तर स्वतःला पेटवून घेऊन पाण्याच्या टाकीवरून उडी मारेल असा इशारा जालना तालुक्यातील रोहनवाडी येथे मराठा कार्यकर्ता शिवाजी तनपुरे यांनी दिला. गावातील जलकुंभावर पेट्रोलची बाटली, आगपेटी घेत ते बसले असून, रात्री उशिरापर्यंत ते खाली उतरले नाहीत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news