

Respect for parents is the true culture: District Collector
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
आई-वडिलांचा सन्मान हीच खरी संस्कृती आहे. आपल्यावर खऱ्या अर्थाने प्रेम करणारे या जगात जर कोणी असेल, तर ते आपले आई-वडील आणि आजी-आजोबा आहेत, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वीमी यांनी केले. वृद्धाश्रमांमध्ये शंभर जणांची क्षमता असतानाही चारशे-चारशे जण वास्तव्यास असल्याची परिस्थिती अत्यंत चिंतेची बाब असल्याची खंत स्वमी यानी व्यक्त केली.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आणि शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी सावंगी येथील संस्कृती ग्लोबल स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे मातृ पितृ पूजन दिवस अत्यंत उत्साहपूर्ण, भावनिक आणि संस्कारमय वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या दश-सूत्री उपक्रमांतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी डॉ. सुनील आदिक, मनीषा आदिक यांचीही उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात वैदिक मंत्रोच्चारणाने झाली. त्यानंतर शाळेचे प्राचार्य बाबासाहेब मोराळकर यांनी प्रास्ताविकात मातृ-पितृ पूजनाची परंपरा, भारतीय संस्कृतीतील कुटुंबसंस्थेचे महत्त्व आणि विद्यार्थ्यांच्या जीवनातील आई-वडिलांचे स्थान यावर सविस्तर मार्गदर्शन केले.
मार्गदर्शन करताना दिलीप स्वामी यांनी या वेळी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी गुरुकुल विद्यार्थी सदन वसतिगृहास भेट देऊन तेथील सुविधा, स्वच्छता व शिस्त यांची पाहणी केली आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केले. संपूर्ण कार्यक्रम भक्तिमय व मंगलमय वातावरणात पार पडला.
विद्यार्थ्यांकडून आई-वडिलांचे पूजन
या कार्यक्रमात सुमारे ६०० विद्यार्थ्यांचे पालक, आई-वडील तसेच आजी-आजोबा मोठ्या संख्येने सहभागी झाले. विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांचे औक्षण करून, पुष्पहार अर्पण करून व वंदन करून कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी मोठ्या संख्येने पालक, शिक्षक, विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.