

ACB Trap in Sambhajinagar Resident Deputy Collector Arrested
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरचे निवासी उपजिल्हाधिकारी यांना लाच घेताना एसीबीने अटक केली आहे. आरडीसी शेतजमिनीच्या कामासाठी ४१ लाखांची मागणी केली होती. यातील ५ लाख रुपये घेताना एसीबीने निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांना रंगेहाथ ताब्यात घेतले. या कारवाईमुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.