New Water Supply Scheme : नव्या पंपहाऊसच्या स्लॅब गळतीची दुरुस्ती सुरू

या गळतीमुळे विद्युत पॅनेलला धोका निर्माण झाल्याने शहराचा ४० एमएलडी वाढीव पाणीपुरवठा १५ दिवसांतच बंद करण्याची वेळ आली होती.
New water supply scheme
New Water Supply Scheme : नव्या पंपहाऊसच्या स्लॅब गळतीची दुरुस्ती सुरूpudhari photo
Published on
Updated on

Repair work on the leaking slab of the new pump house has begun

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहराच्या २७४० कोटींच्या नवीन पाणीपुरवठा योजनेतील नक्षत्रवाडी पंपहाऊसच्या स्लॅबला पहिल्याच पावसात लागलेली गळती दोन दिवसांत दुरुस्त करून पाणीपुरवठा पूर्ववत सुरू केला जाईल, अशी ग्वाही अधिकाऱ्यांनी रविवारी (दि. २८) दिली. या गळतीमुळे विद्युत पॅनेलला धोका निर्माण झाल्याने शहराचा ४० एमएलडी वाढीव पाणीपुरवठा १५ दिवसांतच बंद करण्याची वेळ आली होती.

New water supply scheme
Sambhajinagar News : जायकवाडीजवळ मुख्य जलवाहिनीवरील व्हॉल्व्ह निकामी

हा प्रकार समोर येताच मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी घटनास्थळी धाव घेत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (एमजेपी) आणि कंत्राटदार 'जीव्हीपीआर' कंपनीच्या अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली.

त्यांनी दोन दिवसांत दुरुस्ती पूर्ण करण्याचे कडक आदेश दिले. कंत्राटदाराने इमारतीचे निकृष्ट बांधकाम तर केलेच, शिवाय वॉटरप्रूफिंग न करताच पंपगृहाचा वापर सुरू केल्याचे उघड झाले आहे. या निष्काळजीपणामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आता संपूर्ण योजनेच्या कामावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

New water supply scheme
Sambhajinagar water supply : वाढीव 18 एमएलडी पाणी कुठे मुरतेय ?

सध्या स्लॅबच्या वॉटरप्रूफिंगचे काम युद्धपातळीवर सुरू असून, विद्युत यंत्रणेची तज्ज्ञांमार्फत बारकाईने तपासणी केली जात आहे. कंत्राटदार कंपनीच्या या निष्काळजीपणामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आता संपूर्ण पाणीपुरवठा योजनेच्या कामाच्या दर्जावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news