Railway : रेल्वेचा सर्वसामान्य जनतेला दिलासा, १७ ऑगस्टपासून ३ अतिरिक्त जनरल डब्यांची वाढ

प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन आता काही रेल्वेला कायमस्वरूपी ३ अतिरिक्त जनरल डबे वाढवण्यात आले आहेत.
Railway News
Railway : रेल्वेचा सर्वसामान्य जनतेला दिलासा, १७ ऑगस्टपासून ३ अतिरिक्त जनरल डब्यांची वाढ File Photo
Published on
Updated on

Railways to add 3 additional general coaches from August 17

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : कोरोना काळात जनरल डबे रद्द करण्यात आल्याने सर्वसामान्य प्रवाशांची मोठी अडचण होत होती. ही बाब लक्षात घेऊन काही गाड्यांना एकच जनरल डबा देण्यात आला. दरम्यान प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन आता काही रेल्वेला कायमस्वरूपी ३ अतिरिक्त जनरल डबे वाढवण्यात आले आहेत. या निर्णयामुळे सर्वसामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Railway News
Ambadas Danve : पाडापाडीनंतर बाधितांच्या मोबदल्याचे काय ? विरोधी पक्षनेता दानवे यांचा सवाल, मनपाचे अधिकारी निरुत्तर

दक्षिण मध्य रेल्वेने नांदेड-मनमाड पॅसेंजर, पूर्णा-आदिलाबाद, आदिलाबाद-परळी, परळी-अकोला, पूर्णा-अकोला, पूर्णा-परळी, परळी-पूर्णा पॅसेंजर आदी गाड्यांना कायमस्वरूपी जनरल श्रेणीचे ३ अतिरिक्त डबे जोडण्यात येणार आहेत.

Railway News
Sambhajinagar Crime : पत्नीसह सासूचा गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न, लग्नात ४० तोळे सोने, फ्लॅट देऊनही छळ; पतीला अटक

ही सुविधा १७ ऑगस्टपासून नांदेड-मनमाड, तर १८ ऑगस्टपासून मनमाड-नांदेड, पूर्णा-आदिलाबाद तसेच १९ ऑगस्टपासून आदिलाबाद-परळी वैजनाथ, परळी वैजनाथ-अकोला तर २० ऑगस्टपासून अकोला-पूर्णा, पूर्णा-परळी वैजनाथ, परळी वैजनाथ-पूर्णा या गाड्यांना ३ अतिरिक्त डब्यांची सुविधा उपलब्ध होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news