जलवाहिनी फुटणार नसल्याचे हमीपत्र द्या

आयुक्त येडगे यांचे एमजेपी, जीव्हीपीआरला निर्देश; आज करणार कामाची पाहणी
Sambhajinagar News
जलवाहिनी फुटणार नसल्याचे हमीपत्र द्याFile Photo
Published on
Updated on

Provide a written guarantee that the water pipeline will not burst Commissioner Amol Yedage

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरवासीयांना विनाखंड दररोज आणि मुबलक पाणीपुरवठा व्हावा यासाठी केंद्राच्या अमृत योजनेतून २७४० कोटी रुपये खर्चुन नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम केले जात आहे. असे असतानाही ३९ पैकी केवळ ८ किलोमीटर अंतरापर्यंतच का हायड्रोलिक चाचणी घेतली.

Sambhajinagar News
Sambhajinagar Water Supply : ९०० च्या जलवाहिनीतून पूर्ण क्षमतेने पाणी द्या

संपूर्ण जलवाहिनीची चाचणी का घेतली नाही, प्रेशमुळे जलवाहिनी फुटली) अथवा गळती लागलीच तर जबाबदार कोण, असे म्हणत नवे आयुक्त अमोल येडगे यांनी नाराजी व्यक्त केली. त्यासोबतच जलवाहिनी फुटणार नाही, याबाबत हमीपत्र द्या, असे आदेशही त्यांनी सोमवारी (दि.६) आढावा बैठकीत दिले. त्यासोबतच मंगळवारी कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात येईल, असे सांगितले.

यावेळी एमजेपीच्या मुख्य अभियंता मनीषा पलांडे, कार्यकारी अभियंता दीपेंद्र कोराटे, मनपाचे पाणीपुरवठ्याचे वसंत भोये, उपअभियंता किरण धांडे, योजनेचे तज्ज्ञ के. एम. फालक, एम. बी. काझी यांच्यासह कंत्राटदार जीव्हीपीआर कंपनीचे मुख्य व्यवस्थापक महेंद्र गोगुलूथू, शेख खलील यांची उपस्थिती होती.

Sambhajinagar News
Sambhajinagar news : शहरवासीयांना दोन महिन्यांत मिळेल मुबलक पाणी

सोमवारी दुपारी सर्व विभागांची पाहणी केल्यानंतर त्यांनी मनपा मुख्यालयात नवीन पाणीपुरवठा योजनेचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. या योजनेच्या प्रत्येक कामाचा तपशील त्यांनी बारकाईने जाणून घेतला. जॅकवेलची उभारणी कशा पद्धतीने केली. अॅप्रोच ब्रीज, अशुद्ध पाणी कशा पद्धतीने नक्षत्रवाडी येथील जलश-द्धीकरण केंद्रापर्यंत आणले जाईल. स्कोर व्हॉल्व्ह कुठे आणि कशा पद्धतीने टाकले आहेत. योजनेतील अपूर्ण कामे कोणती आहेत. शहरातील वितरण व्यवस्था कशी राहील, याबाबत माहिती दिली गेली.

दरम्यान, जीव्हीपीआर कंपनीने उघडपणे आपली भूमिका मांडताना सांगितले की, २०२२ मध्ये आम्हाला काम करण्याची परवानगी दिली. जुन्या शहरात सिमेंट रस्ते झाले. रोड फोडणे आणि तो परत दुरुस्त करण्याची परवानगी मिळत नाही. नागरिकांतून संताप व्यक्त केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

२ दिवसांत नक्षत्रवाडीत येणार पाणी

नव्या मुख्य २५०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीतून सध्या फारोळ्यापर्यंत पाणी आले आहे. येत्या दोन दिवसांत हे पाणी नक्षत्रवाडी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत येईल. त्यानंतर जलवाहिनी स्वच्छ करण्याचे काम केले जाणार आहे. पुढील २० दिवसांत पाणी जलशुद्धीकरण केंद्रातून बाहेर पडेल, अशी हमी एमजेपीच्या मुख्य अभियंता मनीषा पलांडे यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news