

पैठण पुढारी वृत्तसेवा : माजलगाव येथे साडेपाच वर्षाच्या चिमुरडीवर शिक्षकाने केलेल्या अत्याचाराची घटना उघडकीस आली होती. याबरोबरच परभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथील एका 4 वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचाराच्या घटना घडलीय या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी (दि.१४) पैठण येथे कहार समाज बांधवांकडून आक्रोश मोर्चा काढण्यात आला असून या आक्रोश मोर्चामध्ये पुढारीचे आभार फलक झळकले आहे.
या मोर्चात छोटे बालक व महिला मंडळ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हातामध्ये फलक घेऊन संबंधित आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करून या अत्याचार प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालविण्याचे मागणीचे निवेदन नायब तहसीलदार राहुल बनसोडे, पोलीस उपनिरीक्षक दशरथ बुरुकुल यांना देण्यात आले या आक्रोश मोर्चात कहार समाज बांधव महिला छोटे बालक मोठ्या प्रमाणावर सहभाग झाले होते.
सोनपेठ येथील अत्याचार घटनेचा सातत्याने पुढारी न्युज चैनल च्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात येत असल्याने, या जन आक्रोश मोर्चामध्ये पुढारी न्यूज नेटवर्क चॅनलचे आभार व्यक्त करणारे फलक महिलांच्या हाती दिसून आले.