प्रा. लोंढे खून प्रकरण : विशाल राठोडची जग्वार कार कोकणवाडीतून जप्त

पिस्टलच्या तपासासाठी पथक खाटूशामला जाणार
Prof. Londhe Murder Case
प्रा. लोंढे खून प्रकरण : विशाल राठोडची जग्वार कार कोकणवाडीतून जप्तpudhari photo
Published on
Updated on

Prof. Londhe Murder Case: Vishal Rathod's Jaguar Car Seized from Konkanwadi

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : प्रा. राजाभाऊ लोंढे हत्याकांडात मुख्य आरोपी विशाल राठोड याने लोंढे यांच्याकडून घेतलेल्या ६५ लाखांपैकी १२ लाख रुपये खर्चुन जग्वार कार (एमएच-१२-एनयू-०३३३) खरेदी केल्याची कबुली दिली. ही कार अपघातग्रस्त झाल्यानंतर ती कोकणवाडी येथील बॉम्बे ऑटो वर्क्स गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी ठेवण्यात आली होती. ती पोलिसांनी जप्त केली. दरम्यान, खुनासाठी पिस्टल खाटूशाम येथून खरेदी केल्याची माहिती समोर आल्याने एक पथक लवकरच खाटूशामला रवाना होणार आहे.

Prof. Londhe Murder Case
Pregnant Woman Assault | गर्भवती महिलेवर हात उचलणाऱ्या मुजोरांना धडा; शहागंजमध्ये 30 दुकानांचे शेड जमीनदोस्त

६५ लाखांपैकी उर्वरित ५० लाखांहून अधिक रकमेचा माग अद्याप लागलेला नसल्याने या पैशांचा वापर नेमका कशासाठी झाला. या व्यवहारात आणखी कोणी गुंतले आहे की का, याचा शोध घेण्यासाठी आर्थिक व्यवहाराच्या तपासाला वेग देण्यात आला आहे.

पिस्टलबाबत पोलिसांची दिशाभूल

हत्येसाठी वापरलेले पिस्टल राठोडने उज्जैन येथून खरेदी केल्याचे सांगत तपास पथकाची दिशाभूल केली. पथक रवाना झाल्यानंतर त्याने अचानक जबाव बदलला. पोलिसांनी खाक्या दाखवताच हे पिस्टल खाटूशाम येथून घेतल्याचे सांगितले. त्यामुळे आता पथक खाटूशामला जाण्याच्या तयारीत आहे. मोबाईल गेमच्या धाग्यानंतर आता पोलिसांनी शस्त्राचा स्रोत, आर्थिक व्यवहार आणि या प्रकरणी मदत करणाऱ्यांवर लक्ष केंद्रीत केले आहे. पुण्यात लपवून ठेवलेला मोबईल हस्तगत करण्यासाठी पथक लवकरच पुण्याला रवाना होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Prof. Londhe Murder Case
Crime News : पोलिसाला संपवण्याची धमकी

२५ मार्चपर्यंत पोलिस कोठडी

विशाल राठोड आणि करण आढे यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता, जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. पवार यांनी दोघांची पोलिस कोठडी २५ मार्चपर्यंत वाढवली. सहायक लोकाभियोक्ता अजित अंकुश यांनी उर्वरित रक्कम, पिस्टलचा स्रोत आणि इतर सहकारी यांचा उलगडा करण्यासाठी वाढीव कोठडीची मागणी केली होती. तपास यंत्रणांनी या प्रकरणात आणखी काही नावे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news