तुला मुलीच होतात म्‍हणत गर्भवती महिलेला मारहाण, २ महिन्याच्या बाळाचा मृत्‍यू

पतीसह सासू-सासऱ्यां विरूद्ध गुन्हा दाखल
Pregnant woman beaten, 2-month-old baby dies
तुला मुलीच होतात म्‍हणत गर्भवती महिलेला मारहाण, २ महिन्याच्या बाळाचा मृत्‍यू Pudhari Photo
Published on
Updated on

पैठण : पुढारी वृत्तसेवा

तुला नेहमी मुलीच होतात आता देखील मुलगी होणार ती आम्हाला नको या कारणाने पतीसह सासरच्या मंडळीने मारहाण केल्यामुळे दोन महिन्याच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाला. त्‍यामुळे पैठण पोलीस ठाण्यात नवगाव येथील पतीसह सासू-सासर्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या विषयी अधिक माहिती अशी की, पैठण तालुक्यातील नावगाव येथील सौफिया फिरोज शेख (वय २५ वर्ष) रा.नवगाव ता.पैठण या तक्रारदार महिलेला यापूर्वी तीन मुली झालेल्या आहेत. असे असताना आता देखील मुलगी होणार ती आम्हाला नको या कारणाने पती फिरोज अत्तर शेख, सासरा अत्तर रहीम शेख, सासू रफिया अत्तर शेख सर्व रा. नवगाव ता. पैठण यांनी संगणमत करून गर्भवती महिलेला मारहाण केली. यामध्ये या महिलेच्या पोटात असलेल्‍या दोन महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाला.

घटना घडल्याने सदरील तक्रारीवरून पैठण पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी पतीसह सासू-सासऱ्यां विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय मदने हे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news