Chhatrapati Sambhajinagar Crime : अल्पवयीन पत्नीस गर्भपातासाठी दबाव, पतीला ठोकल्या बेड्या

गर्भपात नाही केला तर या बाळाची जबाबदारी स्वीकारण्यास दिला नकार
Crime News
Crime Newspudhari photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : प्रेमसंबंधातून विवाह केल्यानंतर दोन महिन्यांच्या गर्भवती अल्पवयीन मुलीला ते बाळ माझे नाही, असे म्हणत १९ वर्षीय पतीने मारहाण करत गर्भपात करण्यास दबाव टाकला. गर्भपात नाही केला तर या बाळाची जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला.

ही घटना १५ मार्च ते १७ एप्रिल दरम्यान मुकुंदवाडी परिसरात घडली. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, रविवारी (दि.२८) रात्री आरोपीला बेड्या ठोकल्याची माहिती सहायक निरीक्षक शिवप्रसाद कहऱ्हाळे यांनी दिली.

Crime News
Sambhajinagar News : पप्पांना सांगून तुला मारायला लावतो : 10 वर्षांच्या चिमुकल्याला धमकावले

१६ वर्षीय पीडित मुलगी आणि १९ वर्षीय आरोपी यांच्यात प्रेमसंबंध होते. आरोपी आंडा आम्लेटचा गाडा चालवतो. सुमारे तीन महिन्यांपूर्वी पीडिता आणि आरोपीने आळंदी येथे विवाह केल्याचे पीडितेने दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे. त्यानंतर दोघे शहरात भाड्याच्या खोलीत राहत होते.

काही दिवसांपूर्वी पीडितेला आपण दोन महिन्यांची गर्भवती असल्याचे समजल्यानंतर पीडितेने ही बाब पतीला सांगितली. मात्र त्याने पोटात असलेले बाळ माझे नाही. हे बाळ काढून टाकण्यासाठी दबाव टाकला. तसेच तो दारूच्या नशेत घरी येऊन वारंवार पीडितेला शिवीगाळ व मारहाण करणे सुरू केले. गर्भपात केला नाही तर या बाळाची जबाबदारी घेणार नाही, अशी धमकीही आरोपीने दिल्याचे पीडितेने सांगितले.

Crime News
Wife Killed Husband : १७ वर्षे अनैतिक संबंध.. पत्नीने पतीला वीजेचे झटके देऊन संपवले! वर्षभरानंतर खुनाचा थरार उघड

गुन्हा दाखल

पीडिता गर्भपातासाठी घाटी रुग्णालयात गेली होती. तेथे वैद्यकीय तपासणीदरम्यान नोंदविण्यात आलेल्या एमएलसी जबाबातून हा प्रकार समोर आला. सुरुवातीला मुकुंदवाडी पोलिसांकडून दाखल करण्यात आलेला संबंधित गुन्हा पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक निरीक्षक शिवप्रसाद कहऱ्हाळे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news