Sambhajinagar News
Sambhajinagar News : नगर रस्त्याची दुरवस्था; हायकोर्टाची शासनाला नोटीसFile Photo

Sambhajinagar News : नगर रस्त्याची दुरवस्था; हायकोर्टाची शासनाला नोटीस

दुरुस्तीसाठी काय प्रयत्न केले? अहवाल सादर करण्याचे आदेश
Published on

Poor condition of city road; High Court issues notice to government

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर रस्त्यावरील खड्ड्यांच्या विरोधात पार्टी इन पर्सन याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. नेवासा ते अहिल्यानगर प्रवासासाठी तीन ते चार तास वेळ लागत असल्याने वाहनधारकांसह बसने प्रवास करणारे परेशान झाले आहेत.

Sambhajinagar News
Sambhajinagar Municipal Recruitment : महापालिकेत २२४ पदांची लवकरच भरती

न्या. विभा कंकणवाडी आणि न्या. हितेन वेणेगावकर यांनी छत्रपती संभाजीनगर व अहिल्यानगर जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना याचिकेत प्रतिवादी करण्याचे निर्देश दिले आहेत. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी काय प्रयत्न केले, यासंबंधीची विचारणा करण्यात आली. या काळात किती अपघात झाले यासंबंधीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश राज्य शासनाला नोटीस बजावताना देण्यात आलेत.

छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर रस्ता रहदारीसाठी महत्त्वाचा आहे. विदर्भ, खान्देश आणि मराठवाड्यातील वाहनधारकांसह प्रवासी बस मोठ्या संख्येने सुरू असतात. अहिल्यानगरहून पुढे पुणे येथे जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पुणे येथे आयटी क्षेत्रात नोकरी आणि शिक्षणासाठी मराठवाडा, विदर्भआणि खान्देशमधील तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने वाहतूक मोठ्या प्रमाणावर आहे.

Sambhajinagar News
Devendra Fadnavis : छत्रपती संभाजीनगरच्या विकासाला गती

छत्रपती संभाजीनगर बसस्थानकाहून पुणेसाठी प्रत्येक दहा मिनिटाला बस आहे. लालपरी, एशियाड, शिव-नेरी, शिवशाही, शिवाई, इलेक्ट्रिक बस मोठ्या संख्येने आहेत. शिवाय मराठवाड्याच्या इतर जिल्ह्यांसह खान्देश व विदर्भातून येणाऱ्या बसची संख्या अधिक आहे. दररोज दीडशेवर खासगी बस पुणेसाठी याच रस्त्यावरून जातात. मात्र नगर रस्त्याची दुरवस्था झाल्याने वाहनधारक, प्रवासी हैराण झाले आहेत. अॅड. आनंद बांगर यांनी खंडपीठात पार्टी इन पर्सन याचिका दाखल केली.

खंडपीठाने किती अपघात झाले आणि रस्त्याच्या दुरुस्तीसाठी काय उपाययोजना करण्यात आल्या, अशी विचारणा राज्य शासनाकडे केली. शासनाच्या वतीने मुख्य सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी बाजू मांडली. राज्य शासनाला नोटीस बजावण्यात आली आहे.

नगरला जाण्यासाठी लागतात सहा तास

अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर रस्ता खराब झाला आहे. अनेक ठिकाणी गुडघ्याएवढे खड्डे पडले आहेत. छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर हे अंतर अडीच ते तीन तासांचे असताना खड्यांमुळे तब्बल सहा तासांचा अवधी लागत आहे. तर नेवासा फाटा ते नगरपर्यंतचे अंतर अवघे ४५ मिनिटांचे असून, प्रत्यक्षात प्रवासासाठी तीन तासांचा कालावधी लागत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news