

Police take strict action against those who harass girls by standing outside schools and colleges
छत्रपती संभाजीनगर: शाळा-महाविद्यालयांबाहेर थांबून मुलींना त्रास देणाऱ्या, धिंगाणा घालणाऱ्या टवाळखोरांवर पोलिसांनी कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्या आदेशानुसार पाच अधिकाऱ्यांच्या विशेष पथकाने सोमवारपासून शहरातील विविध ठिकाणी बडक कारवाया सुरू झाल्या आहेत. टवाळखोरांना लाठीचा प्रसाद देऊन पिटाळून लावण्यात आले.
शाळा-महाविद्यालयांसह मोकळ्या मैदानांमध्ये, कट्ट्यांवर बसून सिगारेट, दारू पिणाऱ्यांवर देखील पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील महाविद्यालये, शाळा परिसर असुरक्षित बनल्याचे चित्र आहे. भांडणे, हाणामारी तसेच मुलींचा पाठलाग, अश्लील शेरेबाजीचे प्रकार वाढले आहेत.
मुकुंदवाडी भागात काही दिवसांपूर्वी नागरिकांनी लेखी निवेदन देऊन कारवाईची मागणी केली होती. तसेच सरस्वती भुवन महाविद्यालयाबाहेर देखील काही दिवसांपूर्वी घडलेला टवाळख ोरानी राडा केला होता. यानंतर महाविद्यालयाच्या प्राचायाँनी थेट पोलिस आयुक्तांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली होती.
या पार्श्वभूमीवर आयुक्त प्रवीण पवार यांनी शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात कोणत्याही प्रकारचा त्रास सहन केला जाणार नाही, असे स्पष्ट करत सहायक निरीक्षक शिवाजी चौरे, उपनिरीक्षक संदीप काळे, अर्जुन कदम, अभिजित चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाला कडक कारवाईच्या सूचना केल्या, या पथकाने सोमवारी दुपारी देवगिरी महाविद्यालय, एस.बी. परिसरात जाऊन टवाळखोरांना बेट लाठ्यांचा प्रसाद देत पिटाळून लावले, अचानक पोलिसांच्या कारवाईमुळे टवाळखाेरांची पळता भुई थोडी झाली. नागरिकांनी पोलिसांच्या कारवाईचे स्वागत केले आहे. सातत्याने अशा कारवाया झाल्या तर टवाळ खोरांची महाविद्यालये, शाळेजवळ फिरकण्याची हिम्मत होणार नाही.