Municipal Council Elections : मतदान व मतमोजणीसाठी पोलिस यंत्रणा सज्ज

सिल्लोड नगरपरिषद निवडणुकीसाठी २ डिसेंबर रोजी मतदान व ३ डिसेंबरला मतमोजणी सुरळीत पार पडावी म्हणून सर्व विभागांना काटेकोर सूचना देण्यात आल्या आहेत.
Municipal Council, Nagar Panchayat Election
Municipal Council Elections : मतदान व मतमोजणीसाठी पोलिस यंत्रणा सज्जMunicipal Council Elections
Published on
Updated on

Police system ready for voting and counting

सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा :

सिल्लोड नगरपरिषद निवडणुकीसाठी २ डिसेंबर रोजी मतदान व ३ डिसेंबरला मतमोजणी सुरळीत पार पडावी म्हणून सर्व विभागांना काटेकोर सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व प्रभारी व एसडीपीओ यांनी बूथ तपासणी करून याची नोंद कंट्रोलला देणे बंधनकारक आहे.

Municipal Council, Nagar Panchayat Election
Nylon Manja : नायलॉन मांजावर वेळीच कारवाई करा

अंमलदार एक डिसेंबरलाच मुक्कामी पोहोचले आहेत. एसआरपीएफबरोबर स्थानिक अधिकारी आणि बूथवाहेर सेक्टर पेट्रोलिंग ठेवण्याचे आदेश आहेत, अशी माहिती पोनि शेषराव उदार यांनी दिली आहे.

राज्य निवडणूक आयोग व निवडणूक विभागाच्या आदेश व सूचनेप्रमाणे सिल्लोड नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी नीलेश अपार यांच्या नियंत्रणात सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संजय देवराय व कारभारी दिवेकर यांनी दिलेल्या मार्गदर्श तत्वे, कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिस प्रशासनाने दिलेल्या आदेशानुसार पोनि शेषराव उदार यांनी प्रसिद्धीसाठी पत्रक जारी केले आहे. त्यात म्हटले आहे, की ओळखचिठ्ठ्यांवर कोणतेही चिन्ह वा पक्षाचे नाव नसावे. मतदानाच्या दिवशी प्रत्येकी दोन वाहनांची मर्यादा, तसेच केंद्रापासून १०० मीटर परिसरात खासगी वाहनबंदी लागू राहील. बूथमध्ये चित्रीकरण करण्यास मनाई आणि मतदान आदल्या दिवशी व मतमोजणी दिवशी मध्यविक्री बंद आहे. सर्व पोलिस वाहनांमध्ये आवश्यक सुरक्षा साहित्य उपलब्ध ठेवणे बंधनकारक आहे.

Municipal Council, Nagar Panchayat Election
Gangapur News : प्रचाराच्या तोफा आज शांत होणार !

पेट्रोलिंग राहणार मतदानानंतर कक्षात जमा होईपर्यंत अमलदारांनी पथकासोबत राहणे आवश्यक आहे. निकालानंतर उमेदवारांची घरे, कार्यालये व संवेदनशील भागांवर कडक लक्ष ठेवले जाणार आहे. एक व दोन डिसेंबर रोजी आस्थापना रात्री १० वाजता बंद ठेवणे आणि सतत पेट्रोलिंग करण्याचे आदेश आहेत. विजय मिरवणुकीस मनाई असून, अचानक मिरवणुकीचे प्रयत्न रोखण्यासाठी तयारी ठेवण्यात येणार आहे.

ईव्हीएम सुरक्षेची पोलिसांची जबाबदारी

इव्हीएम सुरक्षा पोलिसांची जबाबदारी असून, छेडछाड, माचीस, स्फोटके, हत्यारे बूथमध्ये नेण्यास मनाई आहे. एक डिसेंबर रात्री १० वाजेनंतर सभा व सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी नाही. पथकांनी हॉटेल-लॉजेस, स्टेशन, बसस्थानक व संवेदनशील ठिकाणी तपासणी वाढवावी. मतदानाच्या दिवशी कोणताही कर्मचारी गैरहजर नसावा व पक्षपाती वर्तन टाळावे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news