बेवारस मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांचा एआय प्रयोग

मृत महिलेचा सजीव भासणारा फोटो; नागरिकांना ओळख पटविण्याचे आवाहन
sambhajinagar crime news
बेवारस मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांचा एआय प्रयोगfile photo
Published on
Updated on

Police Experiment with AI to Identify Unclaimed Bodies

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील दौलताबाद पोलिस ठाणे हद्दीत आसेगाव शिवारात एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. या मृतदेहाची ओळख पटवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. तपासासाठी पारंपरिक पद्धतीऐवजी सायबर पोलिसांनी आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) या आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतली असून, मृत महिलेचा जिवंत भासणारा फोटो तयार केला आहे. अशा प्रकारे एआयच्या मदतीने ओळख पटवण्याचा हा जिल्ह्यातील बहुधा पहिलाच प्रयोग मानला जात आहे.

sambhajinagar crime news
Nanded Crime : गडगा शिवारात दसऱ्याच्या दिवशीच खून

अधिक माहितीनुसार, सोलापूर-धुळे महामार्गावरील आसेगाव शिवारातील (गट क्र. ३५) पुलाखाली एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी २६ मार्च रोजी दौलताबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बरेच प्रयत्न करूनही या महिलेची ओळख पटू शकली नाही. अनेकदा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत असल्याने किंवा चेहरा विद्रप झाल्याने मूळ फोटोवरून ओळख पटवणे कठीण जाते.

ही अडचण दूर पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी एआयची मदत घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार, सायबर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सोमनाथ जाधव यांच्या पथकाने या तंत्रज्ञानाद्वारे मृतदेहाच्या चेहऱ्याची ठेवण कायम ठेवून ती महिला जिवंत असताना कशी दिसत असेल, असा हुबेहूब फोटो तयार केला आहे. यामुळे नातेवाइकांना किंवा ओळखीच्या व्यक्तींना तिला ओळखणे अधिक सोपे होणार आहे.

sambhajinagar crime news
Crime News : संबंधासाठी त्रास देणाऱ्या सरपंच पुतण्याचा माय-लेकाने केला शेवट

घातपाताची शक्यता

कदाचित या महिलेचा मृत्यू घातपातही असू शकतो. सदर महिलेबाबत कोणाकडेही काही माहिती असल्यास किंवा तिचे नातेवाईक आढळल्यास त्वरित दौलताबाद पोलिस ठाणे किंवा सायबर ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी करण्यात आले आहे.

तपासासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर तपासात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास क्लिष्ट गुन्हे किंवा अज्ञात व्यक्तींची ओळख पटवणे सोपे जाते. एआयच्या मदतीने तयार केलेला हा फोटो अधिक स्पष्ट आणि सजीव वाटत असल्याने जनतेने हा फोटो पाहून ओळख पटवण्यासाठी सहकार्य करावे.
प्रवीण पवार, पोलिस आयुक्त

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news