

छत्रपती संभाजीनगर: याबाबत सविस्तर माहिती अशी की उमेश झुंबरलाल नहार रा शिवाजीनगर गंगापुर यांच्या मालकीची पांढरा रंगाची चारचाकी ( क्रमांक एम.एच.20 E ई 1828) चोरीस गेली होती. ही घटना दि.२६ रोजी संध्याकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास भेंडाळा फाटा ते गंगापुरवर घडली. याबाबत गंगापूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत पोलिसांनी अतिशय कसोशीन तपास करून आरोपी संतोष ओंकार गायकवाड वय २८ वर्ष राहणार ( तलवाडा तालुका गेवराई जिल्हा बीड) याला 24 तासांमध्ये ताब्यात घेतले.
सदरील आरोपी हा चोरी घरफोडी रॉबरीतील गुन्हेगार असून याचे विरोधामध्ये जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात जिल्ह्यात ३० हुन जास्त गुन्हे दाखल आहेत. सदरील आरोपीस पकडल्यामुळे गंगापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुमार सिंग राठोड यांच्यासह तपासणी टीमचे अभिनंदन करण्यात येत आहे. पुढील तपास पोलीस अधीक्षक डॉ. विनय कुमार राठोड उपअधीक्षक सुनील लांजेवार उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप भागवत, पोलीस निरीक्षक कुमारसिंग राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार थोरे पुढील तपास करत आहे.