PMAY beneficiary protest : प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थीचे मनपासमोर धरणे आंदोलन

एससी, एसटी, ओबीसी, कामगार व दिव्यांगांना अर्धी रक्कम माफ करण्याची मागणी
PMAY beneficiary protest
प्रधानमंत्री आवास योजनेत एससी, एसटी, ओबीसी, कामगार व दिव्यांगांना अर्धी रक्कम माफ करावी, या मागणीसाठी मनपावर आंदोलन करताना.pudhari photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत १० टक्के आगाऊ रक्कम रद्द करावी, चॉईस फॉर्मसाठी भरलेली ५ हजार ७०८ रुपयांची रक्कम विचारात घेऊन ताबा द्यावा एससी, एसटी, ओबीसी, कामगार व दिव्यांग घटकांसाठी अर्धी रक्कम माफ करावी, या मागण्यांसाठी इंदिरानगर, गारखेडा येथील नागरिकांनी महापालिका मुख्यालयाच्या प्रवेश-द्वारासमोर शुक्रवारी (दि. २४) धरणे आंदोलन केले. यावेळी मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात आले.

प्रधानमंत्री आवास योजनेत निवड झालेल्या लाभार्थीनी शुक्रवारी सांयकाळी शेख इमरान अहमद यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करत योजनेत सवलतीची मागणी केली. यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की, प्रधानमंत्री आवास योजनेची सोडत काढल्यानंतर लाभार्थीकडून चॉईस फॉर्मसाठी ५ हजार ७०८ रुपये आकारण्यात आले. मात्र आता पुन्हा सुमारे ९ लाख २६ हजार रुपयांच्या घरासाठी १० टक्के रक्कम भरावी, अन्यथा योजनेतून वगळले जाईल, असे महापालिकेकडून सांगितले जात आहे.

PMAY beneficiary protest
पीएम आवास योजनेतील लाभार्थ्यांच्या कर्जासाठी विकासकांनी पुढाकार घ्यावा

तसेच सुमारे ५ हजार लाभार्थीपैकी अनेकांनी आर्थिक अडचणी असूनही चॉईस फॉर्म भरला. मात्र आता सुमारे एक लाख रुपयांची रक्कम भरणे शक्य नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली. लाभार्थीमध्ये बहुसंख्य गरीब, कामगार, मजूर व दिव्यांग असल्याने त्यांच्याकडे इतकी मोठी रक्कम भरण्याची क्षमता नसल्याचेही त्यांनी नमूद केले. मनपाकडून ही रक्कम मोठी नसल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात ती परवडणारी नाही, असे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.

PMAY beneficiary protest
Sangli News : सांगली, मिरज, कुपवाड ड्रेनेजप्रश्नी महासभा वादळी

तर न्यायालयात दाद मागणार

या निवेदनात सर्व लाभार्थ्यांना शासकीय अनुदानाचा लाभ द्यावा, कामगार विभागाच्या योजनांतील सवलती तात्काळ लागू कराव्यात. तसेच एससी, एसटी, ओबीसी व दिव्यांगांसाठी अर्धी रक्कम माफ करावी, अशी मागणी करण्यात आली अन्यथा न्यायालयात दाद मागावी लागेल, असा इशाराही देण्यात आला. या आंदोलनात शेख इमरान, मिर्झा सैफुद्दीन यांच्यासह अनेक महिला व पुरुष लाभार्थी सहभागी झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news