Play school News : चिमुकल्याला वर्गात मुलाकडून मारहाण, २५ वेळा घेतला चावा

भयंकर ! फर्स्टक्राय प्ले स्कूलमध्ये मुलांना कोंडल्याचा प्रकार, व्यवस्थापनाचा भयानक निष्काळजीपणा
Play school News
Play school News : चिमुकल्याला वर्गात मुलाकडून मारहाण, २५ वेळा घेतला चावाfile photo
Published on
Updated on

Play School News: Toddler beaten by another child in class; bitten 25 times

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील सिडको एन १ या उच्चभ्रू भागातील नामांकित 'फर्स्टक्राय इंटेलिटोट्स प्री-स्कूल'मध्ये एक अत्यंत संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. एका २३ महिन्यांच्या चिमुकल्याला वर्गात कोंडून ठेवल्याने, दुसऱ्या एका २ वर्षीय मुलाने त्याच्या अंगाचे अक्षरशः लचके तोडल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, तब्बल अर्धा तास हा प्रकार सुरू असताना शाळेतील एकही कर्मचारी किंवा मदतनीस तिथे फिरकला नाही.

Play school News
UPSC Result: यूपीएससी निकालात महाराष्ट्राची दमदार कामगिरी; 60हून अधिक उमेदवार यशस्वी

एवढेच नव्हे तर, घटनेनंतर शाळेच्या मुख्याध्यापिका आणि व्यवस्थापनाने हा गंभीर प्रकार दडपण्याचा प्रयत्न करत पालकांना चक्क पैशांचे आमिष दाखवले. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात शाळेच्या मुख्याध्यापिका, सीईओ आणि मालकांसह इतरांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ वर्षीय वकील यांचा २३ महिन्यांचा मुलगा हा सिडकोतील फर्स्टक्राय प्री-स्कूलमध्ये जातो. २२ जून रोजी सकाळी १०.३० वाजता नेहमीप्रमाणे दाम्पत्याने मुलाला शाळेत सोडले. मात्र, दुपारी २ वाजताच्या सुमारास मुख्याध्यापिका कांचन येवले यांचा वकिलाच्या पत्नीला फोन आला आणि 'तुमच्या मुलाला खरचटले आहे, लवकर या' असे सांगण्यात आले. घाबरलेले पालक तत्काळ शाळेत पोहोचले तेव्हा त्यांना मुलाच्या चेहऱ्यावर, नाकावर, ओठांवर आणि संपूर्ण शरीरावर गंभीर जखमा व चावे घेतल्याचे व्रण दिसून आले.

याबाबत पालकांनी शाळेकडे विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. 'मुलगा धक्का लागून पडला' असा बनाव सुरुवातीला रचण्यात आला. मात्र, पालकांनी आक्रमक पवित्रा घेत सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली. सुरुवातीला शाळेने फुटेज देण्यास टाळाटाळ केली व फुटेज कट करून पाठवले. मात्र अखेर पालकांच्या दबावाखाली डीव्हीआर ताब्यात देण्यात आला. सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर पालकांच्या पायाखालची वाळूच सरकली.

Play school News
Nashik Shirpur Ganja Seized : शिरपूर येथे एक कोटी रुपयांचा दोन हजार किलो गांजा जप्त

नेमके काय घडले

फुटेजमध्ये स्पष्ट दिसले की, एका मदतनीस महिलेने एका मुलाला बाहेर नेल्यानंतर खोलीचा दरवाजा बाहेरून बंद केला. यावेळी आतमध्ये असलेल्या २ वर्षांच्या मुलाने वकिलाच्या मुलाला तब्बल १५ मिनिटे सलग अमानुष मारहाण केली. त्याने संपूर्ण शरीरावर, डोक्यावर, नाकावर आणि तळपायावर चावे घेतले. या हाणामारीत मुलाला वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या एका चिमुकलीलाही मारहाण करण्यात आली, ज्यामुळे तिला रक्ताच्या उलट्या झाल्या. एवढा सगळा प्रकार घडत असताना शाळेचा एकही जबाबदार व्यक्त्ती, शिक्षक किंवा मदतनीस तिकडे आला नाही.

'आमचे कोणी काही बघिडवू शकत नाही' हा गंभीर प्रकार लपवण्यासाठी शाळेचे सीईओ शुभम महेश्वरी (पुणे), मालक विजय रेड्डी (हैद्राबाद), महाराष्ट्र हेड अनुराधा सिंग, झोनल मॅनेजर वैभव सावदे, रिजनल मॅनेजर मंगेश मुसळे आणि मुख्याध्यापिका कांचन येवले यांनी संगनमत केले. त्यांनी फोनवरून पालकांना पैशांचे आमिष दाखवून 'कुठेही तक्रार करू नका, आमचे कोणी काही बिघडवू शकत नाही' अशी धमकी दिली. सध्या मुलावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून तो गंभीर मानसिक धक्क्यात आहे. पुढील तपास सहायक उपनिरीक्षक विष्णू मुंडे करत आहेत.

गुन्हा दाखल झालेले आरोपी

१. कांचन येवले (मुख्याध्यापिका)

२. शुभम महेश्वरी (सीईओ, पुणे)

३. विजय रेड्डी (मालक, हैदराबाद)

४. अनुराधा सिंग (महाराष्ट्र हेड)

५. वैभव सावदे (झोनल मॅनेजर)

६. मंगेश मुसळे (रिजनल मॅनेजर)

७. शाळेतील मदतनीस व इतर संबंधित

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news