Crime News : फिजिओथेरपीच्या विद्यार्थिनीवर मित्राचा अत्याचार

कपडे बदलतानाचे चित्रीकरण करून ब्लॅकमेल
Crime News
Crime News : फिजिओथेरपीच्या विद्यार्थिनीवर मित्राचा अत्याचारfile photo
Published on
Updated on

Physiotherapy student sexually assaulted by male friend

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : क्लिनिकमध्ये कपडे बदलत असतानाचा छुपा व्हिडिओ काढून एका २५ वर्षीय फिजिओथेरपीच्या विद्यार्थिनीला ब्लॅकमेल करत तिच्यावर मित्राने वारंवार बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपीने तरुणीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केला आणि त्याचेही चित्रीकरण करून तिला धमकावले.

Crime News
Jaldut Railway : जलदूत रेल्वेची आज दशकपूर्ती : तहानलेल्या लातूरसाठी मिरजने लिहिला माणुसकीचा इतिहास

याप्रकरणी मुख्य आरोपी सरफराज मेहबूब गोनगावे (रा. नूतन कॉलनी, अजबनगर) याच्यासह त्याचे वडील आणि भावावर क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरफराजला अटक करण्यात आली असून, त्याला न्यायालयाने ९ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ वर्षीय पीडित तरुणी ही शहरातील एका नामांकित मेडिकल कॉलेजमध्ये फिजिओथेरपीची इंटर्नशिप करत आहे. तिचा मित्र सरफराज गोनगावे याच्या जेनवैन हेअर ट्रान्सप्लांट सेंटरमध्ये ती जानेवारी २०२६ पासून प्रॅक्टिससाठी जात होती. १ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास पीडिता क्लिनिकमध्ये कपडे बदलत असताना सरफराजने तिच्या नकळत मोबाईलमध्ये व्हिडिओ काढला.

त्यानंतर व्हिडिओ दाखवून त्याने शरीरसंबंधाची मागणी केली, मात्र तरुणीने त्याला स्पष्ट नकार दिला. नकार दिल्यानंतर एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात सरफराजने पीडितेला क्लिनिकमध्ये पाण्यातून गुंगीचे औषध दिले. शुद्ध हरपल्यानंतर त्याने तिला ऑपरेशन थिएटरमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केले आणि पुन्हा अश्लील व्हिडिओ तयार केला.

Crime News
CCTV OFF : स्मार्ट सिटी सुरक्षेची यंत्रणाच ब्लाइंड

तब्बल चार तासांनी शुद्धीवर आल्यानंतर सरफराजने हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिला त्या नामांकित मेडिकल कॉलेजमध्ये जाण्यापासून रोखण्याचा आणि स्वतःच्या मर्जीनुसार वागण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला. या व्हिडिओच्या आधारे ब्लॅकमेलिंग करत आरोपी सरफराजने १४ आणि १५ मे २०२६ रोजी क्लिनिकमध्येच तिच्या इच्छेविरुद्ध शरीरसंबंध प्रस्थापित केले. त्यानंतर २० मे रोजी दुपारी १२ ते १ वाजेच्या सुमारास तिला फुलंब्री येथील एका हॉटेलमध्ये नेऊन पुन्हा अत्याचार केला. ३० मे रोजी क्लिनिकमध्येही याच पद्धतीने तिच्यावर बळजबरी करण्यात आली.

आरोपीच्या वडील व भावाकडूनही मारहाण

या सततच्या त्रासाला कंटाळून १५ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास क्लिनिकमध्ये पीडिता आणि सरफराज यांच्यात वाद झाला. यावेळी सरफराजचा मोठा भाऊ अरबाज गोनगावे आणि वडील मेहबूब गोनगावे यांनी पीडितेला शिवीगाळ करत मारहाण केली. आमचे कोणी काही वाकडे करू शकत नाही, अशी धमकी देत अरबाजने तिचा बुरखा फाडला. अखेर तरुणीने गुरुवारी (दि.६) क्रांती चौक ठाणे गाठून तक्रार दिली. तिघा बापलेकावर गुन्हा नोंद करून पुढील तपास उपनिरीक्षक आत्माराम घुगे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news