Sambhajinagar Petrol Diesel Shortage : चार दिवसांचा इंधनसाठा शिल्लक

जिल्ह्याला बाहेरून नियमित पुरवठाही होत आहे, त्यामुळे नागरिकांनी घाबरून अतिरिक्त साठा करू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
Petrol Diesel Shortage
Petrol Diesel ShortagePudhari
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : शहर आणि जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या तुटवड्याची स्थिती निर्माण झाली असून अनेक पेट्रोल पंपांवर नो स्टॉक फलक झळकत आहेत. मात्र जिल्ह्यात चार दिवस पुरेल इतका इंधनसाठा उपलब्ध आहे. शिवाय जिल्ह्याला बाहेरून नियमित पुरवठाही होत आहे, त्यामुळे नागरिकांनी घाबरून अतिरिक्त साठा करू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

शनिवारी मागविण्यात आलेल्या २५ टँकरपैकी केवळ तीन टँकर वेळेत दाखल झाले. रविवारी सुट्टीमुळे पुरवठा विस्कळीत झाला. सोमवारी सकाळी टँकर भरण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने इंधन शहरात पोहोचण्यास उशीर झाला. परिणामी शहरासह वैजापूर, सिल्लोड, फुलंब्री आणि कन्नड तालुक्यांतील अनेक पेट्रोल पंप ड्राय झाले.

Petrol Diesel Shortage
जिल्ह्यात पेट्रोल, डिझेलसाठी लागल्या रांगा

जिल्ह्यातील सुमारे २५ पंप बंद ठेवण्याची वेळ पंपचालकांवर आली. इंधनटंचाईच्या पार्श्वभूमीवर वाहनधारकांकडून जास्तीचे पेट्रोल-डिझेल भरून घेण्याकडे कल वाढला आहे. त्यामुळे कृत्रिम तुटवडा अधिक तीव्र झाल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून काही नागरिकांनी वाहनांचा वापर कमी करून सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय स्वीकारला आहे.

जिल्ह्यात एचपीसीएल, बीपीसीएल आणि आयओसीचे मिळून ३३५ पेट्रोल पंप असून त्यापैकी १०५ पंप शहरात आहेत. पुरवठा विभागाच्या माहितीनुसार, काही पंपांवर एक दिवस तर काही ठिकाणी चार दिवस पुरेल इतका साठा उपलब्ध आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये व अतिरिक्त साठा टाळावा, असे आवाहन केले आहे.

Petrol Diesel Shortage
Beed fuel shortage : प्रशासन गार; सर्वसामान्य बेजार!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news