

पैठण :- ९ जिल्हा परिषद गट व १८ पंचायत समिती गणासाठी भाजप शिवसेनेमध्ये राजकीय दुरावा सुरूच असून भाजप पक्षाच्या उमेदवारांनी नियोजित वेळेत एबी फॉर्म दाखल करण्यात न आल्याची हरकत पैठण निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण फुलारी, तहसीलदार ज्योती पवार यांच्याकडे बुधवारी रोजी शिंदे गटाचे शिवराज भुमरे यांनी दाखल केली होती.
या प्रकारामुळे शिवसेना शिंदे भाजप मधला दुरावा पुन्हा वाढत चालल्याचे चिन्ह निर्माण झाले आहे. गुरुवारी दि.२२ रोजी नामनिर्देशनपत्र छाननी प्रक्रियेत भाजप पक्षाच्या वतीने उशिरा जोडलेले एबी फॉर्म निवडणूक निर्णय अधिकारी यांनी रद्द केले. भाजप वरिष्ठ नेत्यांनी ९ जिल्हा परिषद गट व १८ पंचायत समिती गणाच्या निवडणुकीसाठी भाजप पुरस्कृत उमेदवार निवडणूक लढविणार असल्याची माहिती भाजप पक्षात दोन दिवसांपूर्वी प्रवेश घेतलेले खासदार संदिपान भुमरे, आमदार विलास भुमरे यांचे राजकीय विरोधक माजी नगराध्यक्ष दत्ता गोर्डे यांनी पत्रकारांशी बोलताना जाहीर केले. यामुळे या निवडणुकीत भाजप- शिवसेना शिंदे गटामध्ये निवडणूक दरम्यान चांगलाच रंग भरणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.