

पैठण - पैठण तालुक्यात दि. २६ जानेवारीला विविध गावातील शाळा महाविद्यालय व शासकीय कार्यालयात देशभक्तीपर कार्यक्रमाची साजरा करीत असताना बोकूड जळगाव येथील रामदास नाईक हायस्कूलमध्ये सकाळी सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालक वर्गाच्या उपस्थितीत राष्ट्रीय ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला.
मात्र २६ जानेवारी रोजी राष्ट्रीय ध्वज उतरवण्याची वेळ संध्याकाळी ६.१७ वेळ निश्चित असताना चक्क रामदास नाईक हायस्कूल, बोकूड जळगाव (ता. पैठण) येथील हायस्कूलचे शिपाई मधुकर दगडू खटाने (रा. शिवाजीनगर, छत्रपती संभाजीनगर) याने हायस्कूल येथे उभारलेला राष्ट्रीय ध्वज दुपारी एक वाजता उतरवल्याचा प्रकार घडला. त्यामुळे सदरील प्रकार निदर्शनास आल्याने पालक विद्यार्थी व शिक्षकांनी हायस्कूलमध्ये जाऊन पाहणी केली व राष्ट्रीय ध्वजाचा अवमान केल्या प्रकरणी हायस्कूलचे मुख्याध्यापक कल्याण त्रिंबक राठोड (रा. खिंवसर नगर बिडकीन) यांनी सदरील प्रकाराची बिडकीन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. बिडकीन पोलीस ठाण्याचे सपोनि निलेश शेळके यांनी सदरील शिपाई विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक फौजदार उबाळे हे करीत आहे.