Paithan News | पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या तरुणासह तालुक्यात तीन जणांचा अपघाती मृत्यू

तालुक्यात एकाच वेळी तिन तरुणांच्या मृत्‍यूने हळहळ
Paithan News
अपघातातील मृत महेश श्रीराम हुलजुते, सुशांत संतोष भोजने, अजय दिगंबर आंबेकर
Published on
Updated on

पैठण :- पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या तरुणासह पैठण तालुक्यात तीन जण वेगवेगळ्या अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

अधिक माहिती अशी की पैठण तालुक्यातील रहाटगाव फाट्यावर पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या दावरवाडी येथील सुशांत संतोष भोजने वय २० वर्ष हा तरुण वाहनाच्या धडकेत ठार झाला. मंगळवारी रोजी पहाटे पैठण पाचोड रस्त्यावरील रहाटगाव येथे पोलीस भरतीसाठी रस्त्याच्या बाजूला सराव करीत होता त्‍यावेळी अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या तरुण जागेवरच ठार झाला. तरुणाचा मृतदेह पैठण येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनसाठी दाखल करून अज्ञात वाहनाविरुद्ध गुन्हा नोंद केला.

तर दुसऱ्या घटनेत अजय दिगंबर आंबेकर वय १९ वर्ष रा. पाचोड हा युवक ठार झाला. हा तरुण छत्रपती संभाजीनगर येथून मोटरसायकल क्रमांक MH 20 GR / 1683 वर येत असताना भोकरवाडी (माळीवाडा) येथे वेगाने जाणाऱ्या क्रुझर क्रमांक MH13 AC / 0575 या वाहनाने मोटरसायकलला धडक दिली. यामध्ये हा तरुण ठार झाला.

तिसऱ्या घटनेत महेश श्रीराम हुलजुते वय ३१ रा. पाचोड हा तरुण आपल्या मित्राचा वाढदिवसाच्या कार्यक्रमाला हजेरी लावून कारने घरी येत असताना कारचे नियंत्रण सूटल्याने झालेल्या अपघातात ठार झाला. वळीवाडा परिसरातील टोलनाक्याजवळ कार रोडच्या बाजूला जाऊन दगडाला धडकल्याने यामध्ये महेश हुलजुते गंभीर जखमी होऊन जागेवरच मृत्यू झाला. ही घटना घडली पाचोड पोलीस ठाण्याचे सपोनि सचिन पंडित यांच्या पोलीस पथकाने तातडीने घटनास्थळ जाऊन अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचा मृतदेह पाचोड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. या दोन अपघात संदर्भात पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news