Paithan News | संत एकनाथ कारखान्याचे साखर गोडाऊन महसूल पथकाने केले सील!

कामगारांचे थकीत ८६ लाख ४० हजार रुपये दिले नसल्याने महसूल विभागाची कारवाई
Paithan News
Paithan News | संत एकनाथ कारखान्याचे साखर गोडाऊन महसूल पथकाने केले सील!
Published on
Updated on

पैठण :- १६ कोटी रुपयांच्या बँक कर्ज प्रकरणातील घोटाळ्यात अडकलेले संत एकनाथ सहकारी साखर चालविणारे सचिन घायळ शुगर लिमिटेड कंपनीने कामगाराचे थकीत वेतन ८६ लाख ४० हजार रुपये जमा न केल्यामुळे गुरुवारी दि.५ रोजी महसूल पथकाने न्यायालयाच्या आदेशाने कारखान्याचे दोन साखर गोडाऊन सील केले आहे.

दरम्यान या कारवाईची माहिती स्थानिक महसूल विभागाच्या पथकाने गोपनीय ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की तालुक्यातील संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या १८ कामगारांनी थकित वेतन ८६ लाख ४० हजार ४७३०८ मिळावा यासाठी कामगार न्यायालयात न्याय मागितला होता. यादरम्यान या कामगारांनी उच्च न्यायालयाच्या खंडपीठात याचिका दाखल केली होती यानुसार न्यायालयाच्या आदेशाने दि. ४ मार्च रोजी पैठण येथील महसूल पथकाला रक्कम वसुलीसाठी पाचारण करून सदरील कारखाना चालविणारे सचिन घायळ शुगर लिमिटेड कंपनीने अनेक वेळेस समज नोटीस देऊन कामगाराची थकीत रक्कम वसुलीसाठी प्रयत्न केला.

परंतू या कंपनीने थकीत रक्कम जमा न केल्यामुळे गुरुवारी रोजी तहसीलदार ज्योती पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल पथकातील नोडल अधिकारी राहुल बनसोडे, मंडळ अधिकारी सीमा भोसले, कल्पना पोकळे, रवींद्र जोशी, रमेश सोनवणे, गिरीश चोटुपळ, अनिल गिरी, रवींद्र सोनटक्के, अनिल घोडके यांनी कारखाना परिसरात जाऊन साखरेचे दोन गोडाऊन सील करण्याची कारवाई केली आहे.

ऊस उत्पादक सभासद, कामगार यांची मालमत्ता असलेल्या संत एकनाथ कारखान्यात पैठण महसूल पथकाने सील लावण्याची कारवाई केले असता सदरील माहिती उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित पथकातील अधिकारी कर्मचारी यांनी मात्र संपर्क करून देखील माहिती गोपनीय ठेवण्याचा प्रकार केल्यामुळे. अखेर तहसीलदार ज्योती पवार यांनी कारवाई झाल्याची माहिती दिली. परंतु या दोन गोडाऊन मध्ये साखरेचे पोते व अन्य मालमत्ता बाबत रात्री उशिरापर्यंत तपशीलवार माहिती मिळू शकली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news