Paithan News : वीस हजार वह्यांपासून साकारले छत्रपती संभाजी राजांचे रेखाचित्र

पैठण येथे छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त आमदार विलासबापू भुमरे प्रतिष्ठानच्या वतीने एक अनोखा प्रेरणादायी उपक्रम गुरुवारी (दि.१३) राबविण्यात आला.
Paithan News
Paithan News : वीस हजार वह्यांपासून साकारले छत्रपती संभाजी राजांचे रेखाचित्रfile photo
Published on
Updated on

Paithan News: Drawing of Chhatrapati Sambhaji Raja made from twenty thousand notebooks

पैठण, पुढारी वृत्तसेवा : पैठण येथे छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त आमदार विलासबापू भुमरे प्रतिष्ठानच्या वतीने एक अनोखा प्रेरणादायी उपक्रम गुरुवारी (दि.१३) राबविण्यात आला. शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाची प्रेरणा आणि संस्कार रुजविण्याच्या उद्देशाने तब्बल २० हजार वह्यांपासून श्रीसंत एकनाथ महाराज समाधी मंदिर परिसरात छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य रेखाचित्र साकारण्यात आले. हा ऐतिहासिक उपक्रम पाहण्यासाठी विद्यार्थ्यांसह तरुणांनी मोठी गर्दी केली होती.

Paithan News
छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य रेखाचित्र काढण्यात येणार

यावेळी आमदार विलासबापू भुमरे, तहसीलदार ज्योती पवार, मुख्याधिकारी डॉ. पल्लवी अंभोरे, नाथ मंदिर विश्वस्त मंडळाचे कार्यकारी विश्वस्त दादा पाटील वारे, पोलिस निरीक्षक महादेव गोमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत शैक्षणिक उपयोगासाठी असलेल्या वह्यांपासून तयार होणारे हे भव्य रेखाचित्र समाजामध्ये इतिहासाविषयी अभिमान, संस्कार आणि राष्ट्रभक्तीची भावना जागृत करणारे ठरेल.

Paithan News
Dr Jaysingrao Pawar | भूमिका घेणारे इतिहासकार!

हा उपक्रम विलासबापू भुमरे प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित केला होता. चित्रकार उद्देश पघळ यांनी हे भव्य रेखाचित्र साकारले. या उपक्रमाप्रसंगी प्रतिष्ठानचे शेखर शिंदे, भूषण कावसानकर, माजी नगराध्यक्ष राजूभाऊ गायकवाड, सोमनाथ परदेशी, शिवराज पारीख, राजेश मानधने, मिटकर, ईश्वर दगडे, कृष्णा मापारी, गणेश वरकड, सुनील हिंगे, साईनाथ कर्डिले, सोमनाथ परळकर, पंचायत समिती सदस्य सखुबाई झारगड, नगरसेविका वैशाली परदेशी उपस्थित राहून छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन केले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news