Paithan News | ढोरकीन येथील महिला शेतकरी चढली थेट पाण्याच्या टाकीवर, सातबारा फेरफार रद्दच्या मागणीसाठी शोले स्टाईल आंदोलन!

पैठण तहसील कार्यालयात आंदोलन, पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने आत्‍मदहनाचा प्रयत्‍न टळला
Paithan News | ढोरकीन येथील महिला शेतकरी चढली थेट पाण्याच्या टाकीवर, सातबारा फेरफार रद्दच्या मागणीसाठी शोले स्टाईल आंदोलन!
Paithan News | ढोरकीन येथील महिला शेतकरी चढली थेट पाण्याच्या टाकीवर, सातबारा फेरफार रद्दच्या मागणीसाठी शोले स्टाईल आंदोलन!
Published on
Updated on

पैठण :-पैठण तालुक्यातील ढोरकीन येथील शेतजमिनीच्या सात बारा नकलेवर गैर व्यक्तीच्या नावाने घेतलेला फेरफार रद्द करण्यात यावा या मागणीसाठी महिला शेतकरी थेट तहसील कार्यालयाच्या परिसरातील उंच पाण्याच्या टाकीवर चढून शोले पिक्चर स्टाईलने आंदोलन करून. या महिला शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला.

मात्र यावेळी एमआयडीसी सपोनि ईश्वर जगदाळे व पैठण पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस कर्मचारी एस.एस रगडे, एन.एच बिरुटे, के एस उगले, ठोकळ यांनी मोठे हिमतीने या शेतकरी महिलेला आत्मदहन करण्यापासून रोखले या घटनेमुळे तहसील परिसरात काही वेळ खळबळ उडाली होती.

या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील ढोरकीन येथील शेतकरी महिला शोभा बबन कुदळे वय ५९ वर्ष व पती बबन मारुती कुदळे वय ६५ वर्ष यांच्या कारकीन शिवारात गट क्रमांक ३०५ या शेतीच्या सातबाऱ्यावर एका गैर इसमाच्या नावाने चुकीचा फेरफार घेण्यात आलेला आहे. तो फेर रद्द करण्यात यावा या मागणीसाठी दि. ३० एप्रिल २०२६ रोजी निवेदन देऊन आत्मदहनाचा इशारा दिला होता.

यासंदर्भात तहसील कार्यालयात कोणीही दखल घेत नसल्याचा आरोप करून सोमवारी दि.२५ रोजी या दाम्पत्य सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान ही महिला शेतकरी कुणाला काही कळायच्या आत तहसील कार्यालयाच्या आवारात असलेल्या थेट पाण्याच्या टाकीवर चढली घोषणाबाजी करीत आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र घटनास्थळी कर्तव्यावर असलेल्या पोलीस पथकाने या शेतकरी महिलेस सुखरूप यांना ताब्यात घेतले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news