Paithan News : आपेगाव येथे वीस वर्षीय तरुणाने जीवन संपविले

Paithan News : आपेगाव येथे वीस वर्षीय तरुणाने जीवन संपविले
Published on
Updated on

पैठण : पैठण तालुक्यातील आपेगाव येथील भक्त निवास येथे एका वीस वर्षीय तरुणाने गळफास घेऊन जीवन संपविल्याची घटना गुरुवारी (दि. ९) उघडकीस आली. तुषार स्वप्नील सर्जे (रा. लोहारगल्ली, साळीवाडा, पैठण) असे या तरुणाचे नाव आहे. या टोकाच्या पावलाचे नेमके कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नसल्याचे पोलीस सूत्रांनी दिले.

घटनेचा तपशील

तुषार सर्जे हा पैठण शहरातील एका खासगी स्टॅम्प पेपर विक्रेत्याकडे कामाला होता. त्याचे आई-वडील आपेगाव येथील भक्त निवासमध्ये कामगार म्हणून कार्यरत असल्याने ते तेथेच वास्तव्यास होते. याच ठिकाणी तुषारने छताच्या पंख्याला गळफास लावून आपले जीवन संपविले.

ही घटना लक्षात येताच नातेवाईकांनी त्याला तातडीने पैठण येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.

पोलीस कार्यवाही

पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांनी या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात केली आहे. संबंधित तरुणाने हे पाऊल का उचलले, याबाबत रात्री उशिरापर्यंत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नव्हती. या प्रकरणाचा पुढील तपास बीट जमादार राजेश आटोळे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news