Maratha Reservation Protest: मराठा आरक्षणासाठी पैठणमध्ये एल्गार! हजारो समाजबांधवांचा रास्ता रोको; छ.संभाजीनगर, शेवगाव, पाचोड मार्गावरील वाहतूक ठप्प

‘आता कुठे जायचं, थेट मुंबई’ अशा घोषणा अखंड मराठा समाजाच्या वतीने देण्यात आल्या
Maratha Reservation Protest: मराठा आरक्षणासाठी पैठणमध्ये एल्गार! हजारो समाजबांधवांचा रास्ता रोको; छ.संभाजीनगर, शेवगाव, पाचोड मार्गावरील वाहतूक ठप्प
Published on
Updated on

चंद्रकांत अंबिलवादे

पैठण : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे सुरू केलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी पैठण येथील अखंड मराठा समाजाच्या वतीने बुधवारी (दि. २) सकाळी ११ वाजता पैठण-छत्रपती संभाजीनगर मार्गावरील सह्याद्री चौकात भव्य रास्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आले.

Maratha Reservation Protest: मराठा आरक्षणासाठी पैठणमध्ये एल्गार! हजारो समाजबांधवांचा रास्ता रोको; छ.संभाजीनगर, शेवगाव, पाचोड मार्गावरील वाहतूक ठप्प
Paithan News | विहामांडवा शिवारातील दहा एकर ऊस जळून खाक!

या आंदोलनामुळे छत्रपती संभाजीनगर, शेवगाव आणि पाचोड मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस असून, त्यांच्या प्रकृतीची चिंता वाढत असल्याने राज्य शासनाने मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तातडीने निर्णय घ्यावा, या मागणीसाठी पैठण तालुका मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आले.

Maratha Reservation Protest: मराठा आरक्षणासाठी पैठणमध्ये एल्गार! हजारो समाजबांधवांचा रास्ता रोको; छ.संभाजीनगर, शेवगाव, पाचोड मार्गावरील वाहतूक ठप्प
Paithan News: चांगतपुरी फाट्यावर वाळू तस्कराविरुद्ध पैठण पोलिसांची कारवाई, ३ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

सह्याद्री चौक येथे हजारो मराठा समाजबांधवांनी रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी ‘आता कुठे जायचं, थेट मुंबई’ अशा घोषणा अखंड मराठा समाजाच्या वतीने देण्यात आल्या. या आंदोलनात अनिल राऊत, पवन शिसोदे, साईनाथ कर्डिले, रामेश्वर बावणे, कृष्णा मापारी, ज्ञानदेव मुळे, सुभाष नवथर, महेश पवार, ज्ञानेश्वर उगले, गणेश औटी, किशोर चौधरी, अरुण काळे आणि राजेंद्र बोंबले यांनी सहभाग घेतला. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस निरीक्षक महादेव गोमारे, सपोनि चंद्रकांत पवार, झोपणे शाखेचे लक्ष्मण पुरी आणि संदीप पाटेकर यांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news