

पैठण: पैठण येथील तहसीलदार सारंग चव्हाण यांनी आपल्या महसूल विभागातील एक कर्मचारी व पंटरमार्फत सोमवार दि.३ रोजी वाळूचे हायवा सोडवण्यासाठी एक लाख दहा हजार रुपये लाच घेतल्याचा प्रकार घडला होता. यामुळे पैठण तहसील कार्यालयात तहसीलदार पद रिक्त होते सोमवारी रोजी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्हा अधिकारी कार्यालयातील तहसीलदार दत्ता भारस्कर यांची प्रभारी तहसीलदार म्हणून पैठण येथे नियुक्ती केली. त्यांनी सायंकाळी आपल्या पदाचा पदभार घेतला यावेळी तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार प्रभाकर घुगे, नायब तहसीलदार, कृष्णा मसरूप, नायब तहसीलदार विष्णू पुरी, पुरवठा निरीक्षक कैलास बहुरे, वरिष्ठ पेशकार बालाजी कांबळे, सतीश पेंडसे, कैलास दांडगे यांच्यासह विविध महसूल विभागाचे कर्मचारी अधिकारी उपस्थित होते.