

चंद्रकांत अंबिलवादे
पैठण : पैठण पाटबंधारे विभागाच्या जागेवरील अतिक्रमण हटाव मोहीम पथकावर अतिक्रमणधारक संतप्त झाले. नागरिकांनी सोमवारी (दि.१५) सकाळी उत्तर जायकवाडी येथील बाजार तळावर अतिक्रमण हटवताना अचानक तुफान दगडफेक करून अतिक्रमणाविरुद्ध घोषणाबाजी केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला.
सुदैवने या दगडफेकीत कोणीही जखमी झाले नाही. पोलीस प्रशासनाच्यावतीने बाळाचा वापर करून जमलेल्या संतप्त जमावला पांगवण्यात आले आहे. यावेळी महसूल विभागाचे नायब तहसीलदार राहुल बनसोडे, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सपोनि ईश्वर जगदाळे यांनी संतप्त झालेल्या अतिक्रमण धारक महिला नागरिक यांना समजावून सांगता शासकीय कामात अडथळा करू नका असे आवाहन करण्यात आले. तरीपण अतिक्रमणधारकांनी अतिक्रमण हटाव मोहीम बंद करण्यासाठी राहुलनगर परिसरात ठिया मांडून आंदोलन सुरू केले आहे.
संतप्त झालेल्या नागरिकांनी व अतिक्रमण धारकाच्या विरोधमुळ पाटबंधारे विभागाच्या अतिक्रमण हटाव मोहीमेसाठी असलेल्या यंत्रणेला काही वेळ थांबविण्यात आले. दरम्यान अतिक्रमण मोहीम कायदेशीर कारवाई करून सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती पाटबंधारे सूत्रांनी दिली आहे.