

पैठण :- पैठण तालुक्यातील पिंपळवाडी पिं येथील कापड दुकानात दोन महिन्यापूर्वी चोरी करून फरार झालेल्या आरोपीला एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पथकाने रविवारी दि.२० रोजी अटक केली आहे.
अधिक माहिती अशी की पिंपळवाडी पिं येथे दि.१४/७/२०२६ रोजी शेख रईस मंजूर यांच्या कापड दुकानातून ६० हजार रुपये किमतीचे विविध प्रकारचे शर्ट व पॅन्ट कापड चोरून नेल्याची घटना घडली होती.
तांत्रिक विश्लेषणद्वारे सपोनि भरत मोरे यांनी या चोरी प्रकरणातील आरोपी संतोष ओंकार गायकवाड रा. तलवाडा ता. गेवराई जिल्हा बीड असल्याचे निष्पन्न केले. या आरोपीला एमआयडीसी पोलीस जमादार कर्तरसिंग सिंगल, हवालदार संतोष साळवे यांच्या पथकाने सेलू जिल्हा परभणी येथून ताब्यात घेऊन. पैठण येथील न्यायालयात हजर केले असता. न्यायालयाने सदरील आरोपीला १४ दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली असून पुढील तपास जमादार करतारसिंग सिंगल हे करीत आहे.