Paithan News | चागतपुरी येथील उजव्या कालव्यात हात पाय धुताना पाय घसरल्याने तरुण पाण्यात गेला वाहून!

अंधार झाल्यामुळे तरुणाचा शोध घेण्यात अडथळे
Paithan News
Paithan News
Published on
Updated on

पैठण :- पैठण तालुक्यातील चांगतपुरी येथील उजव्या कालव्यात हातपाय धुण्यासाठी उतरलेल्या एका तरुणाचा पाय घसरून पाण्यात वाहून गेल्याची घटना शनिवारी रोजी सायंकाळी घडली. वाहून गेलेल्या तरुणाचे नाव ओम राम गाझरे वय १९ वर्ष रा.मुधलवाडी ता.पैठण असे आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की तालुक्यातील चांगतपुरी परिसरातील उजव्या कालव्याच्या नंबर एक पुलाच्या खाली शनिवारी रोजी सायंकाळी ओम राम गाझरे हा तरुण एका शेतात टरबूज तोडून घरी परत येत होता. यावेळी मित्राला कालव्यावरील पुलावर उभा करून. कॅनॉलच्या वाहत्या पाण्यामध्ये हातपाय धुण्यासाठी उतरला होता.

हातपाय धुताने पाय घसरून पाण्यात पडला. ही घटना सोबत असलेल्या सहकारी निदर्शनास आल्यामुळे. त्यांनी या मजुराला वाचविण्यासाठी आजूबाजूच्या लोकांना मदत मागितली परंतु तोपर्यंत ओम राम गाझरे हा पाण्यात वाहून गेला. या घटनेची माहिती पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांना प्राप्त झाल्याने त्यांनी तात्काळ बीट जमादार रावसाहेब आव्हाड, संतोष खिळे यांना घटनास्थळ तैनात करून गावकरी यांच्या मदतीने सदरच्या तरुणाचा शोध घेण्यासाठी कालव्यातील पाण्यामध्ये जाळे टाकून प्रयत्न केला. परंतु रात्रीचा अंधार असल्यामुळे उशिरापर्यंत या तरुणाचा शोध लागू नव्हता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news