Paithan News | बिडकीन DMIC पाइपलाइन कामगाराच्या मृत्यूप्रकरणी दोन ठेकेदारांविरुद्ध गुन्हा

मजुराला आवश्यक सुरक्षा साहित्य उपलब्ध करून न देणे तसेच विमा पॉलिसी काढून देण्याबाबत हलगर्जीपणा केल्याचा आरोप
Crime News
Crime News File Photo
Published on
Updated on

Bidkin DMIC Pipeline Worker Death

पैठण : बिडकीन येथील DMIC प्रकल्पासाठी सुरू असलेल्या पाइपलाइनच्या कामादरम्यान मजुराच्या मृत्यूप्रकरणी जगदंबा एंटरप्रायजेस कंपनीच्या दोन ठेकेदारांविरुद्ध पैठण एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मजुराला आवश्यक सुरक्षा साहित्य उपलब्ध करून न देणे तसेच विमा पॉलिसी काढून देण्याबाबत हलगर्जीपणा केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणाच्या तपासानंतर कंपनीच्या व्यवस्थापनातील आणखी काही जणांविरुद्ध गुन्हा दाखल होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Crime News
Paithan News : भुसार धान्याची विक्री ओपन लिलावातून

बिडकीन येथील DMIC प्रकल्पासाठी जगदंबा एंटरप्रायजेस कंपनीमार्फत पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. इसारवाडी परिसरात पाइपलाइनचे काम सुरू असताना २७ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास रेवननाथ आबाजी बोबडे (रा. बोरगाव, ता. पैठण) हे मजूर काम करीत होते. यावेळी गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला होता.

या घटनेप्रकरणी २१ ऑगस्ट रोजी नकुल बाबासाहेब शेळके (रा. बोरगाव, ता. पैठण) यांनी पैठण एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे सहाय्यक पोलिस निरीक्षक भरत मोरे यांनी विठ्ठल भानुदास अवधूत आणि दत्ता विठ्ठल अवधूत (दोघेही रा. बोरगाव, ता. पैठण) या दोन ठेकेदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक कविता जगताप करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news