Paithan Accident | दोन दुचाकींच्या भीषण धडकेत पेट्रोल टाकीचा स्फोटः एक जागीच ठार तर भाजल्यामुळे सहा वर्षीय बालक गंभीर!

पैठण शेवगाव रोडवरील पाटेगाव परिसरात घटना : दोन्ही दुचाकींचा चुराडा
Paithan Accident | दोन दुचाकींच्या भीषण धडकेत पेट्रोल टाकीचा स्फोटः
Paithan Accident | दोन दुचाकींच्या भीषण धडकेत पेट्रोल टाकीचा स्फोटः
Published on
Updated on

पैठण :- पैठण शेवगाव रोडवरील पाटेगाव परिसरात रविवारी दि.२२ रोजी रात्री दोन मोटर सायकलची समोर समोर धडक होऊन झालेल्या अपघातात पेट्रोल टाकीचा स्फोट झाल्याने एक जण ठार तर एक सहा वर्षाचे बालक भाजून गंभीर जखमी झाले आहे.

अधिक माहिती अशी की पैठण येथील रुग्णालयात मुलाला प्रथमोपचार करून मोटरसायकल वरून घरी परतणाऱ्या जितेंद्र हरिचंद्र काळे (वय ३२ वर्ष रा. खडका ता. शेवगाव जिल्हा अहिल्यानगर ) आपल्या पत्नी व सहा वर्षाच्या मुलासोबत गावाकडे जात असताना शेवगाव मार्गे येणाऱ्या मोटरसायकलने या पती-पत्नीच्या मोटरसायकलला पैठण शेवगाव रोडवरील पाटेगाव परिसरात समोरासमोर जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दोन्ही मोटरसायकल पूर्णपणे चुराडा होऊन पेट्रोल टाकीचा स्फोट झाला. यामध्ये जितेंद्र हरिश्चंद्र काळे हा भाजून डोक्याला गंभीर मार लागल्याने जागेवरच मृत्यू झाला तर पत्नीला किरकोळ मार लागला व सोबत असलेल्या मुलगा निखिल जितेंद्र काळे वय ६ वर्ष या अपघातात भाजला व काही अंतरावर फेकल्याने गंभीर जखमी झाला .

या घटनेची माहिती मिळताच खडका गावातील गणेश जाधव, शार्दुल मुसळे, सत्यजित पाखरे, कृष्णा मिसाळ, लहू पालवे, रोहिदास पाखरे यांनी मदत कार्य करून जखमीला तातडीने पैठण येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. सहा वर्षाचा बालक निखिल काळे याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात प्रथमोपचारासाठी नेण्यात आले.

या अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग, जमादार आव्हाड, हवालदार खिळे, फरताळे, आदट, पालवे यांनी अपघाताचा पंचनामा करून दोन्ही मोटरसायकल पोलीस ठाण्यात जमा करून मयत जितेंद्र काळे याचा मृतदेह पैठण येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी दाखल केला आहे.

या अपघात शेवगाव मार्गे वरून पैठणकडे येणारी मोटरसायकल चालविणारा व्यक्ती रहाटगाव ता. पैठण येथील रहिवाशी असून जखमी झालेल्या आहे परंतु रात्री उशिरापर्यंत सदरील जखमीचे नाव पोलिसांना निष्पन्न झाले नव्हते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news