Paithan Crime | ७४ जळगाव परिसरात दीड महिन्यापूर्वी झालेल्या मारहाण प्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल

खून प्रकरणी अटक आरोपीला तीन दिवस पोलीस कोठडी....
Paithan Crime
मृत विष्णू बबन मोरे,व आरोपी वैभव काळे
Published on
Updated on

पैठण :-पैठण तालुक्यातील ७४ जळगाव फाट्याच्या परिसरात ३४ वर्षीय व्यक्तीचा जुन्या वादातून मारहाण करण्यात आल्यामुळे विष्णू बबन मोरे रा. ढाकेफळ ता. पैठण या व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली होती. सदरील गाव पैठण एमआयडीसी व बिडकीन दोन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लगत असल्याने मयताच्या नातेवाईकांनी व ग्रामस्थांनी गाव परिसरातील दारूबंदी व अवैध धंदे बंद करण्यासाठी गाव पातळीवर आंदोलन केले होते. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच अखेर खुनाचे वळण मिळाल्याचे प्रकरण समोर आले आहे.

या प्रकरणात बिडकीन पोलीस ठाण्यात विष्णू बबन मोरे याच्या हत्येप्रकरणी गंभीर गुन्हा दाखल झाल्यामुळे या परिसरात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून. याप्रकरणी मयत व्यक्तीच्या आई पद्माबाई बबनराव मोरे वय ६५, रा. ढाकेफळ, ता. पैठण यांनी गंभीर आरोप करत वैभव आप्पासाहेब काळे वय २४ रा. ढाकेफळ याच्याविरोधात तक्रार दिली. तक्रारीत नमूद केल्यानुसार दि. २१ मार्च २०२६ रोजी रात्री पावणे नऊच्या सुमारास ७४ जळगाव फाटा परिसरात एका पत्र्याच्या शेडमध्ये जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपीने विष्णू मोरे यांच्या डोक्यात लाकडी दांड्याने जोरदार वार करून त्याचा निर्घृण खून केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

घटनेनंतर सुरुवातीला हा मृत्यू अवैध दारू प्रकरणाशी संबंधित असल्याची चर्चा परिसरात झाली परंतु गुरुवार दि७ रोजी थेट खुनाचा गुन्हा दाखल झाल्याने संपूर्ण प्रकरणाला नवीन वळण मिळाल्या आहे. सुरुवातीपासूनच हा घातपात असल्याचा संशय मयताचे नातेवाईक व परिसरातील नागरिकांकडून व्यक्त केला जात होता. विशेष म्हणजे, घटना २१ मार्च रोजी घडूनही तब्बल दीड महिन्यानंतर म्हणजेच ६ मे २०२६ रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला.

त्यामुळे “जर सुरुवातीपासून खुनाचा संशय होता, तर गुन्हा दाखल करण्यास एवढा विलंब का?” असा संतप्त सवाल नातेवाईक व नागरिकांकडून उपस्थित करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनजितसिंग सेना हे करीत असून यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.आरोपी वैभव काळे याला बुधवारी दि.,६ रोजी रात्री राहत्या घरातून पोलीस पथकाने ताब्यात घेतले दरम्यान, आरोपीला गुरुवारी दि.७ रोजी पैठण येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे .

७४ जळगाव फाट्याच्या परिसरातील या गंभीर प्रकरणात अखेर खुनाचा गुन्हा दाखल झाला असला, तरी तपासातील विलंब, सुरुवातीची संथ हालचाल आणि आरोपीला उशिरा अटक केल्याने बिडकीन पोलिस कर्मचाऱ्यांच्या तपासाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news