

Padaswan murder case Accused's custody extended till September 2
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : सिडको एन ६ येथील संभाजी कॉलनी येथे पाडसवान कुटुंबीयांवर हल्ला करून, प्रमोद पाडसवान या तरुणाचा खून केल्याप्रकरणात अटक करण्यात आलेल्या आठही आर-ोपींच्या पोलिस कोठडीत २ सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. हे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.डी. जवळगेकर यांनी शनिवारी (दि.३०) दिले.
ज्ञानेश्वर निमोने, गौरव निमोने, सैरव निमोने, काशीनाथ निमोने, शशीकला निमोने, मनोज दानवे, अरुण विष्णू गव्हाड आणि मंगेश गजानन वाघ यांना संभाजी कॉलनीतील प्रमोद पाडसवान खून प्रकरणी ३० ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. शनिवारी पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना पोलिसांनी पुन्हा न्यायालयासमोर हजर केले असता शनिवरी न्यायालयाने या आठही आरोपींना २ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवणण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान हल्ल्यावेळी वापरण्यात आलेला लोखंडी रॉड जप्त करायचा असून चाकू कोठून आणला याचाही तपास करायचा असल्याची माहिती पोलिसांच्या वतीने देण्यात आली.
निमोने कुटुंबीयांना भेटण्याची परवानगी
निमोने कुटुंबीय व दानवे या सहा जणांच्या वतीने अॅड. संतोष सरताडे आणि उर्वरित दोन आरोपींच्या वतीने अॅड. सचिन शिंदे यांनी बाजू मांडली. अॅड. सरताडे यांनी या वादात निमोने कुटुंबीयांना देखील मारहाण झाली असून, या बाबत पाडसवान कुटुंबीयांवर गुन्हा दाखल करायचा आहे. त्यामुळे निमोने कुटुंबीयांना भेटण्यासाठी परवानगी मागितली. त्यावर न्यायालयाने अॅड. सरताडे यांना परवानगी दिली.